yuva MAharashtra तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघासाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर, संदीप गिड्डे, मिलिंद (बापू) कोरे यांच्या प्रयत्नाला यश !

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघासाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर, संदीप गिड्डे, मिलिंद (बापू) कोरे यांच्या प्रयत्नाला यश !


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. १४ एप्रिल २०२५

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विकास कामांसाठी एक कोटी २० लाखांचा रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्हा वार्षिक योजनेमधून मंजूर केलेला आहे. निधी मंजूर करण्यासाठी भाजपचे किसान महामोर्चा प्रदेश महामंत्री संदीप गिड्ढे पाटील, भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस मिलिंद (बापू) कोरे यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर झाला आहे. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामे करण्यासाठी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्ढे पाटील, भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस मिलिंद बापू कोरे यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता  !

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील स्मशानभूमी आर सी सी शेड व भिंतीचे कंपाउंड व इतर सोयी सुविधा पुरविणे या कामांसाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. बनेवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणारा आरसीसी रस्ता तयार करणे या कामासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. ढालेवाडी ते ढालगाव रस्ता सुधारणा करणे या कामासाठी २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कवठेमहांकाळ ते धुळगाव रस्ता सुधारणा करणे २० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

सावर्डेतील सिद्धेवर मंदिर ते प्रभाकर आडके यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता !

तयार करणे या कामासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सावर्डे गावातील संदीप माळी गिरणीपासून समाधान साळुंखे यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता तयार करण्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. राजापूर गावातील अंगणवाडी ते शांताराम शेवडे यांच्या घरापर्यंत कॉंक्रीट रस्ता व बंदिस्त गटार करणे या कामासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. योगेवाडी ते करोली फाटा रस्ता सुधारणा करणे व सीडी वर्क बांधणे या कामासाठी वीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती भाजपचे सांगली जिल्ह्याचे सरचिटणीस मिलिंद बापू कोरे यांनी दिलेली आहे.


सांगली जिल्ह्यातील विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला असून, तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामे करण्यासाठी भाजप पक्ष सक्षमपणे काम करणार आहे. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या योजनेतून भविष्यात देखील विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होणार आहे, मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी माहिती देखील संदीप गिड्डे पाटील व मिलिंद बापू कोरे यांनी दिलेली आहे.