| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ फेब्रुवारी २०२५
कवठे पिरान येथील श्रेणिक सुरेश सरडे यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून विद्युत अभियांत्रिकी विषयात मिलीमीटर वेव्ह ऍप्लिकेशनसाठी वाइडबँड भव्य मल्टीबँड एमआयएमओ अँटेना विकसित करणे या विषयात पीएच.डी मिळवली. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग सांगली चे प्राध्यापक डॉ. सचिन डी. रुईकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
ए.आय.सी.टी.ई. यांच्या मार्फत गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम दिल्ली यांचे कडून वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग सांगली येथे प्रवेश मिळाला होता. या संशोधना मध्ये 10 संशोधन पेपर आणि 3 पेटंट प्रकाशित केले. या काळात माझे प्रेरणास्थान व मामा श्री. पायगोंडा बापू पाटील (माझी मुख्याध्यापक बापट बाल मंदिर सांगली) यांचे मार्गदर्शन मिळाले. माझे वडील श्री. सुरेश आण्णा सरडे आणि आई सौ. रूपवंती सुरेश सरडे यांचे आशीर्वाद व पाठींबा मिळाला. माझी पत्नी सौ. वैशाली श्रेणिक सरडे नी वेळोवेळी आधार दिला. माझ्या बहिणीनी त्यांना मदत केली.
शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर च्या 61 व्या पदवी प्रदान कार्यक्रम 17/01/2025 रोजी संपन्न झाला. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णण आणि चंद्रकांत पाटील महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.