| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जानेवारी २०२५
निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या विशेष पथकाने गंभीर गुन्ह्यातील फरारी व वॉन्टेड असलेले नऊ संशयित पकडण्यासाठी केलेली उत्तम कामगिरी लक्षात घेऊन, अधीक्षक संदीप घुगे व अप्पर अधीक्षक रितू खोकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
निवडणुकीच्या दरम्यान अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आले होती. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे पथक ही यासाठी विशेष कार्यरत होते. या पथकाने जिल्ह्यातून हद्दपारीचा भंग करून सांगली हद्दीत आलेल्या तीन संशयकांना अटक करून त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केली. तसेच पोलिसांना गुंगारा देत दप्तरी फरारी असलेल्या सहा आरोपींना ताब्यात घेऊन संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग केले होते.
या कामगिरीत सहभागी असलेल्या पथकातील पोलिसांचा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे व अप्पर अधीक्षक रितू भोकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय घारगे हवालदार दीपक पाटील शांतिनाथ जाधव, मोदक सर पाथरवट, किशोर कांबळे, राम सुरवसे व स्वाती पवार यांचा समावेश होता.
जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसावा म्हणून गुन्हेगारांना कडक शासन व्हावे यासाठी दक्ष राहण्याचे आदेश त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. गेले काही महिन्यात जिल्ह्यात, खून, दरोडे, मारामारी आणि इतर गुन्ह्यात झाली असल्यामुळे, प्रसार माध्यमे व नागरिकांतून मोठ्या प्रमाणात टीका होत आहेत. या सर्वांची दखल घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व यंत्रणा सक्षम करण्याचा पवित्रा घेतला आहे.