| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जानेवारी २०२५
नशेसाठी विक्री करण्यात येणारे मेफेन्टरमाइन हे इंजेक्शन पुरविणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात मिरज येथील गांधी चौक पोलिसांना यश आले होते. ही तिन्ही आरोपी सांगली शहरातील असल्याने, आता जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगली शहरावर केंद्रित केले असून, नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन साठा प्रकरणातील मुख्य वित्रक पोलिसांच्या रडारवर असून त्याचा शोध घेतला जात आहे, यासाठी नशा करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकारांना दिली.
मेफेन्टरमाइन इंजेक्शन गोळ्यांचा साठा व विक्री करणाऱ्या तिघांकडे पोलीस कोठडीत कसून चौकशी करण्यात येत आहे. सदर इंजेक्शनचा वापर शरीरसौष्ठव करणारे तरुण मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे आढळून आले आहे. गुरुवारी काही संशयितांकडे महात्मा गांधी चौकी पोलीसांनी अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
मेफेन्टरमाइन इंजेक्शनचा पुरवठा नशिक कोरे साठी करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत. त्यानुसार गांजा नशेच्या गोळ्यांसह मेफेन्टरमाइन इंजेक्शनचा मोठा साठा महात्मा गांधी चौक पोलिसांनी जप्त केला होता. या प्रकरणातील मुख्य वितरक आता पोलिसांच्या रडारवर असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास संदीप घुगे यांनी पत्रकारण समोर बोलताना व्यक्त केला.