| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ डिसेंबर २०२४
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात मंजूर विकास योजना मधील विकास कामासाठी आरक्षित असलेल्या जागा संपादन करण्याची कार्यवाही चांगल्या प्रकारे होण्यासाठी आवश्यक TDR ही संकल्पना व्यापक स्वरूपात राबविण्यासाठी आज TDR बाबत प्रशिक्षण शिबिर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ वसंतदादा पाटील सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये नवीन संगणक प्रणाली बाबत माहिती देण्यात आली. या वेळी ड्रॉप्समन संजय कांबळे शामराव गेजगे, कनिष्ठ अभियंता आण्णा मगदूम, यासिन मगळवारे, रवी भिंगरदेवें, शाखा अभियंता वैभव वाघमारे, नगररचना कडील कर्मचारी वर्ग, उपस्थित होते.