yuva MAharashtra हिरवी भिंत भगवी झाली अन् खासदारांच्या कृत्याने पुण्यातील सदाशिव पेठेत सुरू झाला नवा वाद !

हिरवी भिंत भगवी झाली अन् खासदारांच्या कृत्याने पुण्यातील सदाशिव पेठेत सुरू झाला नवा वाद !



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ३० डिसेंबर २०२
पुण्यातील सदाशिव पेठेतील हिरव्या रंगाच्या भिंतीची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या भिंतीचा रंग बदलला अन् आणखी एका वादाला तोंड फुटलं. पुण्यात सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीत हा प्रकार घडला असून भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिरवा रंग बदलून त्याला भगवा रंग दिल्याचं समोर आलं आहे.

मेधा कुलकर्णी यांनी स्वत: ट्विट करीत याचे फोटोही शेअर केले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नेमकं प्रकरण काय?
पुण्यात सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका भिंतीला हिरवा रंग देऊन तिथे हार, फुले, अगरबत्ती लावून पूजा करण्यात आल्याची माहिती आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती फिरत होता. याबाबत कळताच भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वत: हिरवा रंग दिलेल्या भिंतीवर भगवा रंग दिला आणि तिथे गणपतीचा फोटो ठेवला. मेधा कुलकर्णींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं.


पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले आहेत. आधी छोटेखानी स्वरूप असलेले असलेली ही स्थळे अचानक नंतर काबीज केली जात आहेत. आपण सतर्क राहूया. माझी सर्वांना एकच विनंती आहे आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया, असंही मेधा कुलकर्णींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान मेधा कुलकर्णींच्या या अॅक्शनवर नितेश राणेंनी आनंदाची रिअॅक्शन दिली आहे. या प्रकाराला हिरवं आक्रमण असं म्हणत राणेंनी मेधा कुलकर्णींचं अभिनंदन केलं आहे. मेधा ताईंचं अभिनंदन करतो, हिरवं आक्रमण होत आहेत. हिरवे साप वळवळतात आणि वातावरण खराब करतात. हिरवं आक्रमण थांबवणं आमचं कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे.

दुसरीकडे सुषमा अंधारेंनी या सर्व प्रकारानंतर मेधा कुलकर्णींना चांगलच धारेवर धरलंय. मेधाताईंच्या या अॅक्शनला अंधारेबाईंनी थेट बालिशपणा म्हटलंय. मेधाताई हा बालिशपणा थांबवायला हवा, खासदारांनी देशाचे प्रश्न मांडायला हवेत, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.