yuva MAharashtra उपआयुक्त विजया यादव यांनी अचानक दिल्या महापालिकेच्या विविध विभागांना भेटी !

उपआयुक्त विजया यादव यांनी अचानक दिल्या महापालिकेच्या विविध विभागांना भेटी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ डिसेंबर २०२
महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त शुभम गुप्ता यांनी आज मनपा कार्यालयात उपस्थित राहून दैनंदिन कामकाज पाहत आहेत , सर्व विभाग प्रमुख यांना कार्यालयीन कामकाज बाबत सूचना दिल्या.

महापालिकेच्या उपआयुक्त विजया यादव यानी सोमवारी अचानकपणे विविध विभागांना भेटी देत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अनेक विभागात जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच ज्या ज्या विभागात कर्मचारी आढळून आले नाहीत त्या ठिकाणच्या खाते प्रमुखांना संबंधितावर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच कार्यालयीन वेळेत कोणीही कामावर गैरहजर राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त विजया यादव यानी दिला. बांधकाम विभाग मधील काही कर्मचारी गैर हजर होते. प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत नोटीस बजावली जाणार आहे. यावेळी सहायक आयुक्त सचिन सागावकर, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापूरे उपस्थित होते.


महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाबद्दल नागरिकांतून अनेक वेळा तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. अनेक अधिकारी व कर्मचारी कामाच्या वेळेत गैरहजर असल्याचे प्रकारही आढळून आले होते. याची दखल घेत आयुक्त शुभम गुप्ता व उपयुक्त विजया जाधव यांनी कारवाईचा बडगा उचललेला आहे. याबद्दल महापालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.