yuva MAharashtra कार्यकर्त्यांचा नादच खुळा! यावेळी तीन ठिकाणी झळकले 'अफजलखान वधा'चे भव्य फलक

कार्यकर्त्यांचा नादच खुळा! यावेळी तीन ठिकाणी झळकले 'अफजलखान वधा'चे भव्य फलक


| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. १२ डिसेंबर २०२
गेल्या आठवड्यात जर येथे अफजल खान वधाचे पोस्टर लावलेले पोस्टर पोलीस प्रशासनाने फाडून घेऊन गेल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटना व नागरिक यांनी पोलीस प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. यानंतर आता शहरात ९ डिसेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहरातील प्रमुख महाराणा प्रताप चौक येथे 'अफझलखानवधा'चा भव्य फलक उभा केला, तसेच मंगळवार पेठ येथील मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक अशा ३ ठिकाणी प्रशासनाची अनुमती घेऊन शहरात 'अफझलखानवधा'चे फलक लावण्यात आले आहे.

शहरात ८ डिसेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवप्रतापदिनानिमित्त 'अफझलखानवधा'चे डिजिटल फलक लावण्यात आला होता; मात्र जत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्‍यांनी पोलीस पथकासह येऊन हा फलक जप्त केला होता. हा फलक जप्त करतांना तो फाडला गेल्याने या फलकाची विटंबना झाली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यात पोलिसांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या, तसेच हिंदुत्वनिष्ठांनी याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना दिल्यानंतर त्यांनीही पोलिसांच्या या कृतीचा निषेध करून अप्रसन्नता व्यक्त केली होती. अखेर पोलिसांनी या सर्व गोष्टींची नोंद घ्यावी लागली.

हिंदुत्वनिष्ठांनी स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात संघटितपणे वैध मार्गाने लढा दिल्यास त्यांना यश येते, हे यातून लक्षात येते. महायुतीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना व युवक हिंदुत्व बद्दल अधिक सजग झाला असून, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही महायुतीला जे यश संपादन झाले आहे त्या यशामागे याच हिंदुत्ववादी संघटना व तरुणांचा मोठा सहभाग असल्याचेही समोर आले आहे
.
बातमी व फोटो सौजन्य : सनातन प्रभात