yuva MAharashtra अखेर मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पथदिवे बसले, मिरज सुधार समितीचा पाठपुरावा यशस्वी ठरला !

अखेर मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पथदिवे बसले, मिरज सुधार समितीचा पाठपुरावा यशस्वी ठरला !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १० डिसेंबर २०२
मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी अखेर पथदिवे बसविण्यास सुरुवात झाली आहे. मिरज सुधार समितीचा यशस्वी पाठपुरावा केल्याने हा विषय मार्गी लागला. जानेवारी अखेरपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकाचे काम होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पथदिवे बसविण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरली होती. पथदिवेसाठी केलेल्या सिमेंट कट्ट्यांना धडकून दररोज अपघात घडत होते. 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यावर दुभाजक आणि पथदिवे न बसविल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला होता. याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत पथदिवे आणि दुभाजक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी प्रत्यक्षात रस्त्यावर पथदिवे बसविण्यास सुरुवात झाली आहे.  


मिरज सुधार समितीचे ॲड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, जहिर मुजावर, नरेश सातपुते, सलीम खतीब, अभिजीत दानेकर, वसीम सय्यद, राकेश तामगावे, राजेंद्र झेंडे, रवी बनसोडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा केला. याची दखल घेऊनच हा प्रश्न मार्गी लागल्याने, मिरज शहरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.