| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ डिसेंबर २०२४
पृथ्वीराज पाटील हे राजकारणातील सुसंस्कृत व निःस्वार्थी नेतृत्व आहे. स्व. गुलाबरावांच्या जनसेवेची तळमळ त्यांचे कर्तबगार सुपुत्र पृथ्वीराज पाटील यांच्या नसानसात भिनली आहे. गुलाबरावजी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ तसेच पृथ्वीराजबाबा हेही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत !
बाबांनी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जी लोकसेवा केली आहे त्याला तोड नाही. बाबांच्या डोक्यात, काँग्रेस पक्ष संघटन मजबूत झाले पाहिजे आणि सांगलीचा चौफेर विकास झाला पाहिजे या दोनच गोष्टी आहेत. नऊ वर्षांपूर्वी बाबांनी सांगली शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. सांगली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्ष कार्यकत्यांची त्यांनी भक्कम बांधणी केली आहे. कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणे व हाती घेतलेले काम तडीस नेणे ही त्यांची खास वैशिष्ट्ये आहेत. बाबांनी सांगलीत पक्षाचे काम गतीमान करुन काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळात सांगली काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण केले आहे.
महाआघाडी सरकारच्या काळात बाबांनी सांगली साठी कोट्यवधींचा निधी खेचून आणला हे योगदान लक्षवेधी आहे. त्यांच्या या कामामुळे 'आमदार नसताना एवढं तर आमदार झाल्यावर केवढं'.. अशी जनतेतून प्रतिक्रिया येत होती, हीच त्यांच्या कामाची खरी पोहोचपावती आहे. बाबा हा सांगलीचा सुसंस्कृत सांस्कृतिक चेहरा आहे. नाती आणि गावाकडची माती जपणारा कुटुंब वत्सल माणूस म्हणून त्यांची प्रतिमा आहे.
लोकांचे वाढदिवस, विवाह सोहळे, वास्तुशांती, उदघाटनं, मयताला उपस्थिती, विविध उत्सव व सण, प्रमुख पाहुणे, उद्घाटक म्हणून उपस्थिती, काँग्रेस पक्षाचे उपक्रम, जनतेच्या प्रश्नावरील विविध आंदोलने, मोर्चे, उपोषणे, निवेदने देणे अशा ठिकाणी बाबा गेले नाहीत असे कधीच होत नाही. बाबा हे संवेदनशील आहेत. जनता समस्थामुक्त झाली पाहिजे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. बाबांच्या भोवती कायम लोकांचा गराडा असतो. विविध क्षेत्रात पुरस्कार मिळाला.. निवडणूक जिंकली.. खेळाडू चमकले.. शासकीय सेवेत निवड झाली तर अशा कर्तबगार लोकांचा यथोचित सत्कार करण्यात त्यांना खास आनंद होतो.
मिरज सांगली येथील कार्यालयात ते कायम जनतेच्या कामासाठी उपलब्ध असतात. ग्रामीण व नागरी समस्या सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्न करतात. सांगलीच्या महापुरात पाण्यात उतरुन बाबांनी अनेकांचे संसार वाचवले. जिवीत व वित्तहानी होऊ दिली नाही. पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे सुरू करुन भोजन, निवास, कपडे, औषधोपचार आणि जनावरांना चारा व्यवस्था केली. कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर व औषधे दिली महापूर व कोरोना काळात पायाला भिंगरी बांधून जनतेत मिसळून त्यांना दिलासा व मदत करणारा बाबा आम्ही पाहिला, बैठका व चर्चासत्र आयोजित करुन, त्यांनी सांगलीला स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा सांगली पूरमुक्त व्हावी यासाठी उचलेले पाऊल सांगलीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबांचा नागरी समस्या व त्यावरील उपाययोजनांचा चांगला अभ्यास आहे. सांगलीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी 'ब्रँड सांगली' या त्यांनी सुरु केलेल्या उपक्रमामुळे सांगलीकरांना सांगलीच्या ऐतिहासिक वास्तु, कर्तबगार व्यक्ती यांच्याबद्दल माहितीचा खजिना उपलब्ध होत आहे. या उपक्रमाने सांगलीकर भारावून गेले आहेत.
पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ आणि महागाईमुळे वैतागून गेलेल्या सर्वसामान्य लोकांची दयनीय अवस्था बघून बाबा ज्यावेळी काँग्रेस पक्ष व पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करतात त्यावेळी शासनाच्या उरात धडकी भरल्याशिवाय रहात नाही.
बाबांच्या मनात थोर महापुरुष, संत आणि संविधानाबद्दल आत्यंतिक आदर आहे. शेतकरी, शेतमजूर, हमाल, असंघटित वाढदिवसाला हार बुके ऐवजी वह्या द्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील गोरगरीब मुलांना मदत होईल हे बाबांचे शिक्षण प्रेम बहुजन समाज शिक्षण व्यवस्थेला बळ देणारे आहे.
आज काँग्रेस पक्ष असो अथवा पृथ्वीराज पाटील फौंडेशन असो धर्म.. जात.. पंथ या पलिकडे जाऊन सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची खासीयत निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. माथाडी कामगार, भाजी विक्रेते, पुतळ्याजवळ रिक्षावाले, सफाई कामगार यांच्या विषयी विशेष वात्सल्य भावना आहे.
बाबांनी शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरुन आणून सांगलीत छ. शिवाजी महाराजांच्या अखंड शिवज्योतीची प्रतिष्ठापना केली. ही आपल्या राज्यातील प्रथमच घडलेली घटना आहे. कृष्णाकाठावर बाबांनी श्री रामनवमीला श्रीरामांची भव्य प्रतिमा उभी करुन सांगलीत श्रीराम भक्तीचा महापूर आणला. जनतेच्या कामात श्रीरामललांचे दर्शन घेणाऱ्या बाबांना महात्मा गांधींचा राम अधिक आवडतो. सांगलीच्या सर्व समस्यांची निर्गत होऊन सांगलीत विकासाचे रामराज्य निर्माण झाले पाहिजे हा बाबांचा विचार सांगलीच्या विकासाचा महामार्ग प्रशस्त करणारा आहे.
बेरोजगार युवावर्गाच्या हाताला काम मिळावे.. महिलांना स्वावलंबी करणारे छोटे छोटे उद्योग यावेत.. सांगलीत परकीय गुंतवणूकीचे मोठमोठे उद्योग यावेत.. ही बाबांच्या लोकसेवेतील प्राथमिकता आहे. जन सेवेसाठी सतत कार्यमार असणाऱ्या बाबांची श्री गणेश भक्ती.. प्रशंसनीय आहे. विविध धर्मीय लोकांच्या सण उत्सवात उपस्थित राहून शुभेच्छा देणारे बाबा सहिष्णुतेचे आग्रही आहेत. जातीय दंगलीमुळे सर्वसामान्य लोक भरडले जातात... सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने रहावेत आणि भारतीयत्वाची भावना वृध्दीगंत करावी हा त्यांच्या कार्याचा मूलाधार आहे.
जनतेच्या प्रश्नाला थेट भिडणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. जनतेची गारहाणी ऐकून त्या सोडवण्यासाठी ते पूर्णवेळ व्यस्त असतात, ते जनतेच्या हितासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतात.. त्यामध्ये सातत्य ठेवतात आणि त्यामधून लोकांचा फायदा कसा होईल यासाठी दक्ष असतात. नदीच्या पात्रातील घाणीत उतरुन कृषाणामाईची फूस स्वच्छ करणाऱ्या संविधानप्रेमी धर्मनिरपेक्ष विचाराच्या पृथ्वीराज बाबांचा विधानसभेत पराभव अपेक्षित नव्हता. सांगलीकरांनाही या अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला आहे. बाचा निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून सांगलीच्या सेवेत आहेत. त्यांना उदंड दीर्घायुरारोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
- ए. डी. पाटील सांगली