| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ डिसेंबर २०२४
"सांगलीतील एक माणूस येतो, आठ-दहा दिवस मुक्काम करतो. बहुजनांची डोकी भडकावून निघून जातो. मागे दंगल सुरू होते. तो हात वर करून रिकामा होतो. बहुजांनांची डोकी भडकावून दंगली घडविणारा हा विचार आता ठेचावा लागेल," अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हुसेन दलवाई यांनी आज येथे केली.
येथील मराठा सेवा संघ कार्यालयात काँग्रेस सेवा दलातर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्यासह २७ जणांना विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार मोहनराव कदम, यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुधीर चकोटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मालन मोहिते, जितेश कदम, सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले, तौफिक मौलवी, लता देशपांडे आदी व्यासपीठावर होते.
दलवाई म्हणाले, "पश्चिम महाराष्ट्र पुरोगामी विचारांना साथ देणारा आहे. इथली माणसे कधी जातीभेदाने वागली नाहीत, सर्वांना सोबत घेऊन जाताना दिसली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार माणसं घडवा, असा आहे. दंगली घडवणाऱ्यांचा विचार माणसं तुडवा, असं सांगणारा आहे. डोकं त्यांचं आणि हात बहुजनांचे आहेत. अर्बन नक्षलवादाची भाषा करणाऱ्यांनी त्यांच्या विचाराचे लोक जी हिंसा करत आहेत, त्यावर का मौन बाळगले आहे? काँग्रेसचा विचार हा महात्मा गांधीजींच्या अहिंसा, सत्य विचारांना माणणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खोटं बोलायला, अन्य समाजाचा द्वेष करायला शिकवतो. राष्ट्रवादाच्या नावाने मनुवाद शिकवतो, हिंसा शिकवतो. हा विचार सोडून पुढे जावे लागेल. खचून चालणार नाही, पुन्हा लढावे लागेल."
सुधीर चकोटे म्हणाले, "काँग्रेसला पुन्हा उभारी घ्यावी लागेल, त्यात सेवा दलाचे काम महत्त्वाचे असेल. सांगली जिल्ह्यातील युवकांवर त्यात महत्त्वाची जबाबदारी येणार आहे.
" डॉ. जितेश कदम, मालन मोहिते यांनी पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले. सेवा दलाचे प्रकाश जगताप, पैगंबर शेख, सुरेश कांबळे, अशोकसिंग रजपूत, प्रतीक्षा काळे, मीना शिंदे, अनिल सुगन्नावर, सुनीता मदने, उज्वला कांबळे आदींनी नियोजन केले.
यावेळी संभाजी पाटील, मोहन वनखंडे, सचिन खिलारी, वीर ढोले, दीपाली मगर, सोनम वंजाळे, वैभव सूर्यगंध, शाहीर मोहन यादव, अंजली भिडे, विजयकुमार खाडे, सविता गावडे, अपर्णा गोसावी; डॉ. अमोल कोरे, डॉ. नंदकुमार मोरे, पद्मा येवलेकर; राकेश दड्डुणावर, सविता काकडे, अजित करांडे, चंद्रकांत जाधव, वर्षाराणी चव्हाण, स्वरुपा चव्हाण; राजकुमार ढोले; दिनकर काकडे, डॉ. मोहन लोंढे, प्रतीक्षा जाधव, पौर्णिमा जगताप, वरील बातमीमध्ये विठ्ठलराव काळे मीना शिंदे शैलेंद्र पिराळे विक्रम सिंह उर्फ राजू पाटील सुरेश कांबळे सुरेश गायकवाड आटपाडीचे अध्यक्ष राजेंद्र सावंत इस्लामपूर शहर चे अध्यक्ष राजू सावकार अल्ला बक्ष मुल्ला कडेगाव चे योगेश महाडिक विटा शहर चे अध्यक्ष बाळासाहेब पाटील इत्यादी सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.