yuva MAharashtra भा. ज. पा. प्रसिद्धी प्रमुख म्हणून यशस्वी जबाबदारीबद्दल केदार खाडीलकर यांचा आ. पडळकर यांच्या हस्ते सत्कार !

भा. ज. पा. प्रसिद्धी प्रमुख म्हणून यशस्वी जबाबदारीबद्दल केदार खाडीलकर यांचा आ. पडळकर यांच्या हस्ते सत्कार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ डिसेंबर २०२
२००४ ते २०२४ सलग २० वर्ष सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचा प्रसिद्धी प्रमुख म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते केदार खाडीलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रकाश ढंग व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

२००४, ते २०२४ या वर्षांत झालेल्या सांगली विधानसभा, व सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या छापील प्रचार साहित्याची निर्मिती करण्याचे काम खाडीलकर यांनी उत्कृष्टरित्या केले. त्याचप्रमाणे सांगलीत आलेल्या भाजपच्या सर्व नेत्यांच्या पत्रकार परिषदा घेणे, 
पत्रकारपरिषदे साठी बाहेरून आलेल्या नेत्यांना ब्रिफींग करणे, वृत्तपत्र व वाहिन्यांना सर्व कार्यक्रमांच्या बातम्या देणे हे काम देखील चांगले झाल्याने केदार खाडिलकर यांना प्रदीर्घकाळ काम करण्याची संधी मिळाली.

कै. संभाजी पवार यांनी २००४ साली ह्या पदावर केदार खाडिलकर यांची निवड केली होती. पण त्यानंतर सलग २० वर्ष हे पद पक्षातील वाढत्या गर्दीत सुद्धा बिनविरोध माझ्याकडे राहिले हे महत्वाचे. अर्थात या सर्व कालखंडात पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी यांची कायम मदत मिळाली. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने भाजप मधील खूप दिग्गज नेत्यांना जवळून बघता आले, त्यांच्या ओळखी झाल्या ही माझ्या दृष्टीने खूप आनंदाची गोष्ट आहे. 

आवड असली की सवड मिळते या न्यायाने व्यवसाय सांभाळून मला हे काम करता आले. या सर्व कामात मला सांगलीतील सर्व वृत्तपत्र संपादक, व पत्रकारांचा तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील सर्व पत्रकारांची कायमच खूप मदत झाली आहे, अशी भावना केदार खाडीलकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.