yuva MAharashtra सुधीरदादांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री आज सांगलीत; विविध संस्था, संघटना आणि कार्यकर्ते यांच्याबरोबर संवाद !

सुधीरदादांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री आज सांगलीत; विविध संस्था, संघटना आणि कार्यकर्ते यांच्याबरोबर संवाद !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ नोव्हेंबर २०२
सांगली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी एकापाठोपाठ एक स्टार प्रचारक सांगलीत येत आहेत. कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोफ सुधीर दादांसाठी धडाडून गेली. आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे येत असून सांगलीतील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.

सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून, त्यांना समाजातील विविध घटकांतून वाढता पाठिंबा मिळत आहे. अशातच स्टार प्रचारकांमुळे त्यांची बाजू अजून मजबूत होत आहे. या स्टार प्रचारकांकडून केंद्र आणि राज्य सरकारकडून राबविण्यात आलेल्या व येणार असलेल्या समाजोन्नती योजनांची माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपा व सुधीरदादा गाडगीळ यांच्या बाबतच्या फेक नरेटिव्ह पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न फोल ठरणार आहे.


डॉ. प्रमोद सावंत हे सांगली हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य, सांगलीतील चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी आणि विविध बँकांचे पदाधिकारी, अधिकारी यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत. बामणोली येथील विवेकानंद हॉस्पिटलला भेट, डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य, बिल्डर्स असोसिएशन क्रीडाई संस्था यांचे पदाधिकारी यांच्याबरोबर करणार आहेत. दक्षिण भारत जैन सभेच्या वखार भागातील मुख्यालयाला ते भेट देणार आहेत.