yuva MAharashtra भाजप महायुतीचे आ. सुधीरदादा गाडगीळ यांचा वचननामा प्रसिद्ध !

भाजप महायुतीचे आ. सुधीरदादा गाडगीळ यांचा वचननामा प्रसिद्ध !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ नोव्हेंबर २०२
गेल्या दहा वर्षात मी जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार मतदारसंघात नागरिकांच्या मागणीनुसार सहा ठिकाणी पूल उभे केले, बहुतांश भागात चांगले रस्ते, गटारी केल्या. समाज मंदिरे आणि तीर्थक्षेत्र विकासाची कामे केली. सांगली पेठ रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्ती तसेच सांगली कोल्हापूर रस्त्याचे रुंदीकरण यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी मिळवून आणला. यापुढील पाच वर्षात सांगली अधिक समृद्ध, संपन्न, प्रगत आणि चांगली करण्यासाठी मी काम करणार आहे. मागणीमुक्त सांगली आणि समस्यामुक्त सांगली असे अभिवचन असलेला वचननामा आज सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष माहितीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी प्रसिद्ध केला. पुढील पाच वर्षांमध्ये हा वचननामा काटेकोरपणे अमलात आणण्यासाठी आपण वचनबद्ध आणि कटिबद्ध असल्याचे आमदार गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजप नेत्या नीता केळकर, माजी महापौर संगीता खोत, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार, सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव स्वाती शिंदे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे आदी नेते

सांगली विधानसभा मतदारसंघ मागणीमुक्त आणि समस्यामुक्त करण्याचा निर्धार !

वचननाम्यात आमदार गाडगीळ यांच्या जाहीरनाम्यात खालील महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे. मध्यवर्ती बस स्थानकामध्ये नवीन बस पोर्टची उभारणी, सांगली माधवनगर रस्त्यावर ई बस पोर्ट उभा करणे, सांगलीत ठिकठिकाणी प्रशस्त पार्किंग व्यवस्था, सांगलीची महापुरापासून कायमस्वरूपी मुक्तता करण्यासाठी राज्य शासनाच्या योजनेचा पाठपुरावा अशा वचनांचा समावेश आहे.

आणि वचननाम्यात दिलेली ठोस आश्वासने अशी सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व गावात तसेच सांगली शहरात मंजूर आणि प्रगतीपथावर असलेली सर्व कामे पूर्ण करणार, झोपडपट्टीमुक्त सांगली शहर ही योजना गतीने राबवणार, हमाल, तोलाईदार कष्टकरी कामगार यांच्यासाठी पेन्शन आणि घरकुल योजना राबवणार, सर्वधर्मियांसाठी अद्ययावत आणि सुसज्ज अशी स्मशानभूमी उभी करणार. सांगलीतील फळे व शेतीमाल निर्यातीसाठी सुसज्ज मार्गदर्शन केंद्र उभारणार. सांगलीतील व्यापार पेठेत सुविधा निर्माण करून व्यापारपेठ अधिक विस्तारित आणि समृद्ध बनवणार, फळमार्केट जवळच फाईव्ह स्टार फळ मार्केट उभे करणार, छत्रपती शिवाजी महाराज मंडई सुसज्ज व हायटेक करणार, नमामि कृष्णामाई योजना राबवणार, सांगली, हरिपूर , पद्माळे या ठिकाणी पर्यटन क्षेत्राचा विकास, सांगलीत शामरावनगर परिसरात पाण्याचा निचरा व्हावा यासाठी विशेष योजना, वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय अत्याधुनिक यंत्रणेसह सुसज्ज बनवणार, शासकीय रुग्णालयात नवीन हॉस्पिटलची उभारणी, कॅन्सर उपचार रुग्णालयाची उभारणी करणार, कुपवाड येथे सर्व सोयीने युक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी, 


मेक इन सांगली या उपक्रमांतर्गत सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन आणि मोठे उद्योग आणून किमान पाच ते सात हजार तरुणांना रोजगार देणार, शेतीमाल प्रक्रिया उद्योगाचे क्लस्टर सांगलीत पूर्ण करणार. आमदार गाडगीळ यांनी वचननाम्यात म्हटले आहे, की सांगली मतदारसंघात मॉडेल स्कूल आणि स्मार्ट अंगणवाडी चे उभारणी सारथी संस्थेच्या धर्तीवर सांगलीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणी, कौशल्य विकास केंद्राची उभारणी महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांचे औद्योगिक क्लस्टर तयार करणार, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देणार, सांगलीत महापालिकेच्या खुल्या जागेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाची उभारणी आणि तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट उभा करणार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रैक, फुटबॉल ग्राउंड व स्टेडियमसाठी पार्किंग सह सुविधा निर्माण करणार, कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण तयार करणार.

आमदार गाडगीळ म्हणाले, या वचननाम्यात दिलेल्या प्रत्येक वचनाची पूर्ती करण्यासाठी मी अथक प्रयत्न करणार आहे. प्रत्येक कामाचा पाठपुरावा सातत्याने सुरू राहणार आहे. पाच वर्षानंतर यापैकी बहुतांश कामे पूर्ण झालेली आपल्याला दिसतील.