| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० नोव्हेंबर २०२४
सलग दहा वर्षे सुधीरदादांनी सांगली विधानसभा मतदारसंघात रस्ते, पूल, ड्रेनेज सिस्टीम अशी अनेक कामे केली आहेत. मागणीमुक्त आणि समस्यामुक्त सांगली हा त्यांचा पुढील पाच वर्षाचा अजेंडा आहे. सांगली शहरासह मतदारसंघात एकही समस्या शिल्लक ठेवायची नाही असा निश्चय त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी सांगलीतील जनतेने ठामपणे उभे राहिले पाहिजे. सांगलीचा आणखी गतीने चौफेर विकास करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना सांगलीतून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केले.
हॉटेल चालक मालक असोसिएशन तसेच बार असोसिएशन यांच्यामार्फत मुख्यमंत्री सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संवाद कार्यशाळा झाली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, सांगलीच्या विकासाची सुरू झालेली ही परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी सुधीरदादा गाडगीळ तिसऱ्यांदा आमदार होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार निश्चितच येणार आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे सुधीरदादा गाडगीळ मुंबई आणि दिल्ली येथील सरकारच्या मदतीने सांगलीसाठी आणखी निधी आणतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे सांगलीजवळ लवकरच विमानतळ उभा राहील.
यावेळी बोलताना डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, सांगलीमध्ये 'सिंगल विंडो क्लीयनर्स' व्यवस्था असावी. तसेच हॉस्पिटलिटी कोर्स सुरू करावेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनांचाही सांगलीसाठी लाभ करून घेता येईल. त्यासाठी सुधीरदादा गाडगीळ निश्चितच पाठपुरावा करतील.
या वेळेस संजय परभणी परमणे आणि ॲडव्होकेट बाळासाहेब देशपांडे यांची भाषणे झाली. हॉटेल चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश पवार, लहू बडेकर, श्रीपाद कोमकर, आदित्य बावडेकर, मिलिंद खिलारे, युवा नेते गौतम पवार, उल्हास चित्रे, योगेश कुलकर्णी, अशोक सावंत, सतीश कुंभार, रमेश शेट्टी, ॲडव्होकेट कुंभार, ॲडव्होकेट अमोल बोळाज, शैलेश पाटील, माधव कुलकर्णी, सर्जेराव मोहिते, प्रवीण गोंधळे तसेच बार असोसिएशन व हॉटेल चालक-मालक असोसिएशन सदस्य उपस्थित होते.