| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ नोव्हेंबर २०२४
पृथ्वीराज पाटील यांनी गेल्या दहा वर्षांत सांगलीसाठी खूप काम केले आहे. ते संविधान संरक्षक आहेत. सांगलीची अस्मिता व अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी, सांगलीकरांना चांगले रस्ते, गटारी, शुध्द व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांना निवडून आणण्यासाठी जयहिंद सेना गुंठेवारी चळवळीच्या वतीने जाहीर पाठिंबा पृथ्वीराज पाटील यांच्या मारुती चौकातील प्रचार सभेत देण्यात आला आहॆ. यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून हजारोंच्या संख्येने शिवाजी पुतळा येथुन मारुती चौक येथे होणाऱ्या कार्यक्रमात जयहिंद सेना गुंठेवारी चळवळ यांचे वतीने पाठिंबा पत्र दिल्याचे गुंठेवारी चळवळीचे जनक व जयहिंद सेना पक्षप्रमुख चंदन चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांचे पाठिंबा दर्शक भाषणही झाले. पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जगदंब चव्हाण म्हणाले की, गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ पृथ्वीराज बाबा पाटील यांनी गुंठेवारी भागातील नागरिकांसाठी उठवलेला आवाज महत्त्वाचा आहे. विशेषतः महापूर आणि कोविड काळात केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या सर्व कार्याची जाणीव गुंठेवारी भागातील नागरिकांना आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी म्हणून ते आमचे प्रश्न हिहिरीने वाढतील याची खात्री असल्यानेच आम्ही पृथ्वीराज बाबा पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी महेश मासाळ, विजय बल्लारी, शंकर तुपे विश्वनाथ तुपे, पै. रणजीत चव्हाण, मारुती घुटूगडे, युवराज मोने, पदाधिकारी व व गुंठेवारी चळवळीतील कार्यकर्ते व जयहिंद सेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.