| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ नोव्हेंबर २०२४
येथील कल्पद्रम क्रीडांगणावर आयोजित हॅबीटेंट प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अजित डॉ. मराठे म्हणाले, "दिवसेंदिवस बांधकाम क्षेत्रात दिवसेंदिवस नाविन्यपूर्ण बदल होत आहेत. त्याला अनुरुप कार्यपद्धती या क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्यांनी अलंबण्याची गरज आहे. यशस्वी व्हायचे असेल तर व्यावसायिकांनी 'स्केल', 'स्पीड' आणि 'स्किल' या तीन 'एस पॅक्टर'वर लक्ष केंद्रित करुन वाटचाल करण्याची आवश्यकता असल्याचे मत निर्माण रियाल्टर बिल्डर डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित मराठे यांनी व्यक्त केले.
इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस् असोसिएशनतर्फे येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर आयोजित 'हॅबिटॅट २०२४' या बांधकाम आणि वास्तुविषयक साहित्याशी निगडीत भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. १ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सांगलीकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पीएनजीचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ, हॅबीटेंटचे कन्व्हेनर प्रमोद शिंदे, विश्वस्त व्ही. एल. मेहता, असोसिएशचे अध्यक्ष केदार टाकवेकर, सचिव प्रमोद पाटील, निखील शहा, शीतल शहा उपस्थित होते.
दोन दशकांपासून अभियंते आणि वास्तुविशारद एकत्रित येवून अत्यंत उत्तम दर्जाच्या हॅबीटेंट प्रदर्शनाचे यशस्वीरित्या आयोजन करत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. तुम्ही एखादा प्रकल्प जेव्हा ग्राहकांसमोर मांडता तेव्हा त्यात नाविन्य असले पाहिजे. तसेच साध्या साध्या गोष्टीतून देखील तुमच्या ब्रँड जनमानसात कसा रुजेल याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ब्रँड बिल्डिंगला या क्षेत्रात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. तुमच्या ब्रेडचे नाव घेतले की लोकांचा त्यावर डोळे झाकून विश्वास बसला पाहिजे."
डॉ. राजा दयानिधी म्हणाले, "प्रत्येकाच्या स्वप्नातील घराला परीपुर्ण करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. वास्तुकलेची उत्तम उभारणी सांगलीकरांकडून होते, त्यात आता मागणी वाढते आहे. त्यामुळेच लोकांना परवडणारी घरे आणि सोईसुबवधा उपलब्ध करून द्याव्यात."
सिद्धार्थ गाडगीळ म्हणाले, "इंजिनिअर्स आर्किटेक्ट असोसिएशनमध्ये कार्यरत असणारा प्रत्येकजण हा आधुनिक विश्वकर्मा आहे. एक मॉडेल शहर बनविण्यासाठी असोसिएशनने प्रयत्न करावेत, त्याचवेळी पर्यावरणपूरक घर प्राधान्य द्यावे." बांधण्यास अध्यक्ष केदार टाकवेकर यांनी आढावा घेतला. कन्व्हेनर प्रमोद शिंदे यांनी गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या प्रदर्शनात वेळोवेळी झालेले बदल आणि नव्या तंत्रज्ञानाची माहिती सांगलीकरांना दिली जाते, असे स्पष्ट केले. उज्वल साठे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुमित टाकवेकर यांनी केले. वास्तुविशारद अभिषेक व्होरा यांनी आभार मानले. यावेळी हॅबीटेंटच्या सर्व प्रायोजकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. वास्तुविशारद मुकुल परीख, प्रमोद परीख, प्रकाश जाधव, रणदीप मोरे, आशिष चिंचवाडे यांच्यासह उद्योजक, अभियंते, बास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
भारतात प्रथमच 'सिम्पोलो कलेक्शन' सांगलीत
सिन्फोलो टाईल्सच्या दालनात जागतिक दर्जाचे कलेक्शन भारतात प्रथमच सांगलीतील हॅबीटेटमध्ये सादर करण्यात आले आहेत. यामध्ये बसाल्टिनो, अक्लीमेया, ग्लिपस्टोन आणि व्हेनिटो या प्रकारांचा समावेश आहे.