| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ नोव्हेंबर २०२४
सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस काँग्रेस सेवा दलाच्या वतीने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभि सेवा दलाचे प्रदेश संघटक पैगंबर शेख सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांच्या हस्ते प्रियदर्शनी इंदिरा जी गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी सेवा दलाचे प्रदेश संघटक पैगंबर शेख यांनी इंदिराजी गांधी यांच्या जीवनाविषयी सखोल माहिती देऊन त्यांच्या काळामध्ये गरीबी हटाव साठी वीस कलमी कार्यक्रम राबविण्यात आले होते सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय होते
यावेळी जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष अजित ढोले यांनी बोलताना इंदिराजी गांधी यांनी देश अखंड ठेवण्यासाठी सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन देशाच्या उन्नतीसाठी काम केले आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली बँकेचे राष्ट्रीयीकरण करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हरितक्रांतीनंतर लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर आपल्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीमध्ये श्वेतक्रांती आणून देश अर्थव्यवस्थे मध्ये व अन्नधान्यांमध्ये स्वावलंबी बनविले यावेळी शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे संघटक मौलाली वंटमोरे यांनी पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी करून जगामध्ये आपल्या देशाचे नाव अग्रेसिव केले होते.
काँग्रेस पक्षाचे महान नेते लालबहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल इंदिराजी गांधी यांच्यासारख्या महान नेत्याचे जयंती पुण्यतिथी निमित्त आपण एकत्र येऊन त्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सेवा दलाने सतत कार्यरत राहावे या पुढील काळामध्ये काँग्रेस पक्षाला भक्कम बनवण्यासाठी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी कार्य करावे असे सांगितले यावेळी स्वागत प्रास्ताविक सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले यांनी केले व शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मांडले यावेळी बाबगोंडा पाटील जिल्हा सचिव सचिन चव्हाण मुफित कोळेकर प्रमोद आवळे अशोक कांबळे मिरजेचे शब्बीर पठाण अंनिस बेपारी शमशाद नायकोडी जहांगीर मोरे युनूस जमादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते