yuva MAharashtra मनोज जरांगे यांचे घूमजाव, निवडणूक रिंगणातून घेतली माघार, मराठा समाजाला दिलेला संदेश बनला चर्चेचा विषय !

मनोज जरांगे यांचे घूमजाव, निवडणूक रिंगणातून घेतली माघार, मराठा समाजाला दिलेला संदेश बनला चर्चेचा विषय !


| सांगली समाचार वृत्त |
अंतरातली सराटी - दि. ४ नोव्हेंबर २०२
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी विविध आंदोलने करणाऱ्या मनोज जरांगे यांनी काही दिवसापूर्वी आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभे करणार असल्याची घोषणा केली होती. उद्या सकाळी आपल्या उमेदवारांचे नावे व मतदार संघ जाहीर करू अशी घोषणा काल रात्रीच त्यांनी केली होती. मात्र आज सकाळी मतदार संघ व उमेदवार यांच्या नावाची घोषणा करण्यात ऐवजी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाजात खळबळ माजली आहे.

या निवडणुकीतून माघार घेण्याचे कारणही जरांगे पाटील यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. मराठा समाजाचे उमेदवार केवळ जातीवर निवडून येऊ शकत नाहीत त्यामुळे एका जातीवर लढणे शक्य नाही असे सांगत, त्याने मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाच्या नेत्यावर याचे खापर फोडले. जरांगे पाटील म्हणाले की मध्यरात्री तीन वाजेपर्यंत आमची चर्चा सुरू होती. आणि 14 उमेदवार ही निश्चित केले होते. मात्र मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाच्या नेत्याकडून उमेदवारांची कोणतीही यादी आली नाही. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.


आपल्या विरुद्ध गनिमी कावा सुरू असल्याचा आरोप करीत जरांगे पाटील यांनी, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या समाज बांधवांना अर्ज मागे घेण्याची सूचना केली आहे. महाविकास आघाडी किंवा महायुती दोन्ही बाजूचे नेते सारखेच आहेत. त्यामुळे आपण कोणालाही पाठिंबा देणार नाही असे सांगून ते म्हणाले की आता समाजाने ठरवावे कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे. मराठा समाजासाठी माझे आंदोलन यापुढेही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आता जरांगे पाटील यांच्या या निर्णयाबाबत उलट सुलट प्रतिक्रिया उलट आहेत. ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून, योग्य वेळी त्याला परिस्थितीची जाणीव झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्याच वेळी महायुती व महाआघाडीतील नेत्यांनी जरांगे पाटील यांच्या या निर्णयाविरोधात टीका केली असून, जरांगे पाटील यांच्याकडून मराठा समाजाला भरकटवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप केला आहे. मराठा समाजातही जरांगे पाटील यांच्या निर्णयाबाबत नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे यापुढे जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाची धार कमी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.