| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ नोव्हेंबर २०२४
सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघांचा निकाल हाती आला असून जिल्ह्यातील ८ पैकी ५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून त्यात भाजपचे ४ तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा १ उमेदवार विजयी झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
मिरजेतून सुरेश खाडे, सांगलीतून सुधीरदादा गाडगीळ, इस्लामपूरातून जयंत पाटील, कडेगावमधून विश्वजित कदम, जतेतून गोपीचंद पडळकर, शिराळ्यातून सत्यजित देशमुख, खानापूरातून सुहास बाबर तर तासगावातून रोहित पाटील विजयी झाले.
मिरज विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदबार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुरेश खाडे हे चौथ्यांदा विजयी झाले असून त्यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा सुमारे ४५ हजार मतांनी पराभव केला.
आज सकाळी मिरज येचील वैरण बाजार मधील शासकीय गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासूनच सुरू खाडे आघाडीवर होते. अखेर त्यांनी शिवसेनेचे सातपुते यांचा ४५ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला, विजयानंतर सुरेश खाडे यांची मिरजेत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
आ. सुधीरदादांची हॅट्रीक सांगली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून हॅट्रीक साधली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा सुमारे ३६ हजार मतांनी पराभव केला. तर काँग्रेसच्या बंडखोर उमेदबार जयश्री मदन पाटील यांचे डिपॉझीट जप्त झाले.
सांगली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी आज सकाळी तरूण भारत स्टेडियमवर करण्यात आली. पहिल्या टप्प्यापासूनच आमदार सुधीरदादा गाडगीळ आघाडीवर होते. त्यांची आघाडी वाढत अखेर त्यांनी ३६ हजाराहून अधिक मतांनी विजय संपादन केला. सुधीरदादा गाडगीळ हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले असल्याने त्यांना यावेळी मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. विजयानंतर त्यांची भव्य मिरवणूक सांगलीत काढण्यात आली.
लोकशाहीत जनमानसाचा निर्णय सर्वोच्च आहे त्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात जनतेने दिलेला कौल आपण खुल्या मनाने स्विकारतो. यापुढेही काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहून सत्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढाई सुरूच ठेवू, अशी ग्वाही काँग्रेसचे पराभूत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
जनतेने दिलेला कौल मी मान्य करते केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांचीच राज्यात असावी अशा पद्धतीने जनतेने निर्णय घेतलेला दिसतोय लाडक्या बहिणींनी भाजपला तारलं पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर निवडणूक लढवण्याचा निर्णय सर्व कार्यकत्यांचा आग्रहाखातील मी घेतला मला चिन्ह जनतेपर्यंत पोचविण्या साठी फार कमी वेळ मिळाला तरीसुद्धा कोणताही मोठा पक्ष किथा नेता बरोबर नसताना सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे मला इथपर्यंत मतं मिळाली सर्व कार्यकत्यांचे व सर्व मतदारांचे मी आभार मानते अपयशाने खचून न जाता यापुढील वाटचाल धैयनि करायची आहे कार्यकत्यांनी खचून न जाता कामात रहावे विजयी उमेदवारांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी पराभवानंतर व्यक्त केली.
जयंत पाटील यांचा निसटता विजय इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रबादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना निसटता विजय प्राप्त करावा लागला. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी निवडणूकीत टक्कर दिली होती. पहिल्या फेरीपासून वर-खाली होणारी ही निवडणूक अखेर जयंत पाटील यांनी १३ हजार ५०० मतांनी जिंकली, ही निवडणूक चुरशीची झाली. अखेरपर्यंत या निवडणूकीचे पारडे वर-खाली होत होते. विजयानंतर त्यांचे पूत्र प्रतिक पाटील यांनी इस्लामपूरात विजयी मिरवणूक काढली होती. जयंत पाटील यांच्यावतीने प्रा. शामराव पाटील यांनी सर्टिफीकेट स्विकारले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघामध्ये झालेल्या निवडणुकीत महायुतीच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिवर्तनासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेतले. मी गेल्या पाच वर्षापासून अखंड मतदारांच्या सेवेत राहिलो. झालेल्या निसटत्या पराभवावर चिंतन करुन यापुढे तेवढ्याच ऊर्जेने व सेवाभावनेतून सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. कार्यकत्यांनी खचून न जाता पुन्हा तेवढ्याच चांगल्या विचाराने हातात हात घालून सर्वांना बरोबर घेऊन मतदार संघाच्या विकासासाठी, जनतेच्या न्याय, हक्कासाठी आपण लढत राहाणार आहोत. या निवडणूकीत मतदार बंधु, भगिनी यांनी मतदानाच्या माध्यमातुन दिलेला निर्णय मान्य असून यापुढील माझे आयुष्य आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल, महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनींचे मनपुर्वक आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया निशिकांत प्रकाश भोसले पाटील यांनी पराभवानंतर व्यक्त केली.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातही चुरशीची निवडणूक झाली. या मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजित कदम हे सुमारे ३० हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव केला. सुरूवातीच्या काही फेऱ्यांमध्ये विश्वजित कदम पिछाडीवर होते. मात्र त्यांनी नंतर आघाडी घेतली आणि विजयी संपादन केला. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव विजयी उमेद्वार विश्वजित कदम हे ठरले आहेत. पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघातील जनतेला नोकरीची खोटी आश्वासने दिल्याने आमचा निसटता पराभव झाला आहे. जनतेने दिलेला कौल मान्य असून राज्यात बहुमताने महायुतीचे सरकार आले असल्याने मतदारसंघाच्या विकासासाठी ताकतीने काम करणार असून, मतदारसंघातील १ लाखा पेक्षा जास्तीच्या मतदारांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला आहे. त्या विश्वासाला खरे उत्तरणार असून, टेंभू योजनेचे शिल्पकार स्व.आ. संपतराव (आण्णा) देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपत शेवटच्या श्वासापर्यंत पलूस कडेगावच्या जनतेची सेवा करणार, अशी प्रतिक्रिया संग्रामसिंह देशमुख यांनी पराभवानंतर दिली.
जतेतून आ. गोपीचंद पडळकर विजयी जत मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आ. गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत यांचा पराभव केला असून त्यांनी सुमारे ३८ हजार मतांनी विजय संपादन केला आहे. या मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली होती. तम्मनगौडा रविपाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात स्थानिक व बाहेरचा यावरून मोठा संघर्ष झाला होता.
जत विधानसभा मतदारसंघावर मागील निवडणुकीत काँग्रेसच्या विक्रम सावंत यांनी विजय मिळवला होता. तर या निवडणुकीत भाजपाच्या गापीचंद पडळकर यांनी विजय मिळवला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा जत विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे गेला आहे.
शिराळा मतदारसंघातून भाजपचे सत्यजित देशमुख यांनी राष्ट्रबादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांचा पराभव केला. ही निवडणूक चुरशीची झाली होती. विद्यमान आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक दारूण पराभव सहन करावा लागला. शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजीत देशमुख यांनी १३०७३८ एवढी मत घेतली आहेत. तर राष्ट्रबादीच्या मानसिंगराव नाईक यांनी १०८०४९ एवढी मत घेतली आहे. सत्यजीत देशमुख यांनी २२,६८९ मतांची आघाडी घेऊन बिजय खेचून आणला आहे. ■ खानापूरातून सुहास बाबर विजयी
खानापूर-आटपाडी मतदारसंघातून शिक्सेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदबार सुहास बाबर यांनी विजय संपादन केला. त्यांनी राष्ट्रबादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वैभव पाटील आणि बंडखोर उमेदवार राजेंद्र देशमुख या दोघांचा सुमारे ७५ हजार मतांनी पराभव केला. या मतदारसंघातून सुहास बाबर यांचे वडिल अनिल बाबर हे यापूर्वी निवडून आले होते. मात्र त्यांचे अकाली निधन झाले. अनिल बाबर यांनी शिवसेना फूटीच्यावेळी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे सुहास बाबर यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सर्वात लहान आमदार रोहित पाटील तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रबादी काँग्रेसने माजी खासदार संजयकाका पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. तर राष्ट्रबादी शरदचंद्र पवार पक्षाने रोहित पाटील यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू होती. संजयकाका पाटील यांनी मोठी मोर्चेबांधणी केली होती. तर अजित पवार यांनीही तासगाव मतदारसंघात जाहीर सभा घेऊन टीका केली होती. माजी खासदार संजयकाका पाटील यांना फवठेमहांकाळ येथील अजितराव घोरपडे यांनी पाठिंबा दिला होता. यामुळे संजयकाका पाटील यांचे पारडे जड असल्याचे दिसत होते. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात संजयकाका पाटलांना मोर्चेबांधणी केली होती. यामुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू होती. पण अखेर नवखे असणारे रोहित पाटील यांनीच गड राखला आहे. तासगाव मतदारसंघात रोहित पाटील यांना १२८४०३ एवढी मत मिळाली आहे, तर राष्ट्रबादी काँग्रेसच्या संजयकाका पाटील यांना १००७५९ एवढी मत मिळाली आहेत. रोहित पाटील यांनी २७,६४४ एवढ्या मतांनी आघाडी घेऊन विजय मिळवला आहे.