| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ नोव्हेंबर २०२४
सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिवस व 26 11 मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या पोलीस व नागरीक यांना काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले प्रारंभी सां काँग्रेस सेवा दलाचे संघटक शिवाजीराव कनप व माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण जी धोत्रे यांच्या हस्ते संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्याचप्रमाणे यावेळी हनुमान साबळे यांनी बोलताना नवीन व्यवस्था नवा विचार संविधानाच्या रूपाने बहुजन समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सपूर्त केला. पैगंबर शेख यांनी पंडित जवाहरलाल नेहरू डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संविधान समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सपूर्त केला. त्या संविधानाच्या रक्षणास आपण सर्वांनी कटीबद्ध राहू असे सांगितले.
यावेळी 26/11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी स्वागत व प्रस्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले व शेवटी आभार अजित ढोले यांनी मानले यावेळी आशिष चौधरी, राजेंद्र कांबळे, जहांगीर मोरे, प्रतिक्षा काळे, युनूस जमादार, सुरेश गायकवाड, दीपक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.