| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० नोव्हेंबर २०२४
सांगली जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी २ हजार ४८२ मतदान केंद्रांवर मतदान होत असून यातील १ हजार ५०९ मतदान केंद्रांचे वेबकास्टींग करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
वेबकास्टींग करण्यात येत असलेल्या मतदान केंद्रांवर दोन व्हिडीओ कॅमेरे लावण्यात आले आहेत. एका कॅमेऱ्याव्दारे मतदान केंद्राबाहेरील व एका कॅमेऱ्याव्दारे मतदान केंद्रातील संपुर्ण परिस्थितीवर नजर ठेवली जाणार आहे. वेबकास्टींग करण्यात येत असलेल्या १ हजार ५०९ मतदार केंद्रावरील लाईव्ह चित्रीकरण मा. निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या ठिकाणी पाहण्याची सोय करण्यात आली आहे.