yuva MAharashtra तुमच्यासाठी पाच वर्षे द्या..मागे पडलेल्या सांगलीला पंचवीस वर्षे पुढे नेतो.. -पृथ्वीराज पाटील यांची सांगलीकरांना साद !

तुमच्यासाठी पाच वर्षे द्या..मागे पडलेल्या सांगलीला पंचवीस वर्षे पुढे नेतो.. -पृथ्वीराज पाटील यांची सांगलीकरांना साद !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ नोव्हेंबर २०२
महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पृथ्वीराज पाटील यांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले आणि संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी संविधान संरक्षणासाठी आशीर्वाद मिळू द्या असे साकडे घातले. तरण्याबांड सुमारे दिड हजार युवकांनी मोटार सायकलवर मांड टाकली आणि 'आपला पृथ्वीराजबाबा - सांगलीसाठी खंबीर उभा' चा जयघोष करत मोटार सायकलची महारॅली मार्गस्थ झाली.

पृथ्वीराजबाबा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्षाचा व महाविकास आघाडीचा विजय असो, भारत माता की जय अशा घोषणांचा निनादात वाहतुकीला कोणताही अडथळा न करता महारॅली पुढे सरकत होती. वाटेत दुतर्फा सांगलीकर कौतुकाने पहात पृथ्वीराजबाबा निवडून येणार असा अभिप्राय व्यक्त करताना दिसत होते. टिळक चौक - गणपती मंदिर चौक - काॅलेज काॅर्नर - लव्हली सर्कल - चिन्मय पार्क - सूतगिरणी चौक - कुपवाड महावीर व्यायाम शाळा-विजयनगर चौक - ८० फूटी रोड - त्रिमूर्ती रिक्षा स्टाॅप - शामरावनगर चौक करत महारॅलीची सांगता झाली. 

उघड्या जीपमध्ये उभे राहून पृथ्वीराज पाटील जनतेला हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन करत होते. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवृष्टी होत होती.


यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'विद्यमान आमदारांनी महागाई, बेरोजगारी, अशुद्ध आणि अपुरा पाणीपुरवठा, खड्डेमय रस्ते, उद्योजक व व्यापाऱ्यांच्या समस्या, मुली व महिलांवरील अत्याचार, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या हलाखीचे जीवन या प्रश्नावर विधानसभेत कधीच प्रश्न मांडले नाहीत. मी तुमच्यासाठी पाच वर्षे दिली. आता सांगलीची दयनीय अवस्था बदलण्याची गरज आहे. त्यासाठी आमदार बदला आणि माझ्या हात चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून द्या. सांगलीचा आमदार कसा असतो हे मी कामातून दाखवून देणार हा माझा शब्द आहे.'

या मोटर सायकल रॅलीतून सांगली अधिक चांगली करण्यासाठी जनतेनेच साथ द्यावी. हा संदेश दिला गेला. रॅली मध्ये सांगली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.