| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ नोव्हेंबर २०२४
काल रात्री सांगली शहरातील टिंबर एरियामध्ये भानामती करण्याच्या उद्देशाने एका बॉक्समध्ये कवळ फळ, काळी बाहुली, फुले, अंडी आणि लिंबू आणून आले होते. याबरोबरच कन्नड भाषेत लिहिलेली एक चिठ्ठीही आढळून आली यामध्ये विरोधकांचा नाश व्हावा असा मजकूर एका कागदावर लिहिण्यात आला आहे. या प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
आता हा प्रकार नेमका पुन्हा विरोधात करण्यात आला आहे याची चर्चा चवीने सुरू आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने हा प्रकार कोणाला उमेदवाराविरुद्ध आहे, की कोणा एका व्यक्ती विरोधात ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा प्रकार ताजा असतानाच, मी रोज तालुक्यातील मौजे डिग्रज मध्ये नरबळी देण्याचा प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांनी सदर व्यक्तीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले याप्रकरणी दोन संशयता विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या गाडीसह अन्य एक स्विफ्ट डिझायर मोजे डिग्रज येथील , स्मशान भूमी जवळ आली
या गाडीमधून दोन अल्पवयीन मुलांसह सुमारे दहा व्यक्ती खाली उतरल्या. यामध्ये महिलांचाही समावेश होता. यानंतर गाडीच्या प्रकाश झोतात स्मशानभूमी जवळ असलेल्या झाडाखाली ठेवलेल्या मूर्तीचे यापैकी एका व्यक्तीकडून पूजा मांडण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तेथून येण्या जाणाऱ्यांनी संबंधितांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी दमदाटी व शिवीगाळ सुरू केली.
यानंतर या लोकांनी मौजे डिग्रज चे पोलीस पाटील सतीश पाटील, सरपंच तानाजी जाधव व अन्य ग्रामस्थांना मोबाईल वरून या प्रकाराचे कल्पना दिले. तेव्हा पोलीस पाटील, सरपंच यांच्यासह सुमारे 200 ग्रामस्थ स्मशानभूमी दाखल झाले. यावेळी झाडाखाली एक मात्रिक पूजा करत होता तर काही लोक त्याच्यामागे उभे होते त्यापैकी दोघांच्या हातात लिंबू टोचलेले त्रिशूल गाडीमध्ये लोक गाडीतच बसून होते. तेव्हा या लोकांना ग्रामस्थांनी जाब विचारल्यानंतर, "यात तुमचा काय संबंध तुम्ही इथून निघून जा !" अशी उद्धट उत्तरे दिली. तेव्हा संतप्त ग्रामस्थांनी संशयतांना चांगलाच होतो चोप दिला व याची कल्पना सांगली ग्रामीण पोलिसांना मोबाईल वरून दिली.
अल्पावधीतच पोलीसही त्या घटनास्थळी पोहोचले आणि पुढील अनर्थ टळला. यानंतर मौजे डिग्रजचे सरपंच तानाजी जाधव यांनी पोलिसांना एक पत्र देऊन संशयतावर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणातील संशयितांनी नावे सांगितले नाहीत. मात्र या प्रकरणातील गाडीच्या नंबर वरून तपास केला असता ही गाडी माधव नगर मधील गोसावी गल्ली येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्याने या प्रकाराची कबुली दिली व मूर्ति काढून नेण्याचे मान्य केले.
मौजे डिग्रज येथील ग्रामस्थ व पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघा अल्पवयीन मुलांचा नरबळी देण्याचा प्रकार थांबला. दरम्यान सांगलीतील भानामतीचा प्रकार व मौजे डगरी येथील नरबळीचा प्रकार याबाबत संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.