| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ नोव्हेंबर २०२४
महापालिकेचा प्रभाग क्रमांक ११ काँग्रेसचा बालेकिल्ला. माजी महापौर, उपमहापौरासह नगरसेवकांची मतदारसंघात तगडी फौज असताना भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांना तब्बल २ हजार ८०० मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
आमदार गाडगीळ यांना ५ हजार ८००, काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना ३ हजार ३२ तर अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांना २ हजार ६१८ मते मिळाली आहेत. गाडगीळ यांना मिळालेल्या मताधिक्याने प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. महापालिका क्षेत्रातील सांगली येथील प्रभाग क्रमांक ११ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. माजी महापौर कांचनताई कांबळे, माजी नगरसेवक मनोज सरगर, माजी उपमहापौर उमेश पाटील, शुभांगी साळुंखे नेतृत्व करतात. पण प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांनी नेटाने काम केल्याने गाडगीळ यांना या प्रभागात मोठे मताधिक्य मिळाले आहे.
उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. प्रभागातील काँग्रेसचे मतदार पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यामध्ये विभागले गेले. परिणामी त्याचा गाडगीळ यांना लाभ झाला. भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांना तब्बल २ हजार ८०० मतांचे मताधिक्य मिळाले. आमदार गाडगीळ यांना ५ हजार ८००, काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना ३ हजार ३२ तर अपक्ष उमेदवार जयश्रीताई पाटील यांना २ हजार ६१८ मते मिळाली. भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक रमेश सर्जे, शीतल पाटील, विलास सर्जे, युवा नेते दीपक माने, सुजित काटे यांनी कार्यकर्त्यांसह प्रभागात प्रचार यंत्रणा राबवली.