yuva MAharashtra सांगलीचे अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना जनता दलाचा पाठिंबा !

सांगलीचे अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना जनता दलाचा पाठिंबा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ नोव्हेंबर २०२
सांगली विधानसभा महिला अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना जनता दल सेक्युलर माजी आमदार स्वर्गीय शरद पाटील समर्थकांनी जाहीर पाठिंबा दिला. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दलितांसाठी झटणारे आणि वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या उमेदवाराला साथ देण्याचा जनता दलाने निर्णय घेतला आहे. पुरोगामी विचारांचा नेते म्हणून माजी आमदार स्वर्गीय शरद पाटील यांचे नाव चर्चेत आहे. राजकारण, समाज कारणातले आदर्श व्यक्तिमत्व म्हणून स्वर्गीय शरद पाटील यांच्याकडे पाहिले जाते.

कुपवाड येथे प्रचार बैठकीत जनता दल सेक्युलर कडून जाहीर पाठिंबा दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. जनता दल पक्षाच्या पाठींब्याने मोठे बळ मिळाल्याचे जयश्री पाटील यांनी सांगितले.


यावेळी दिगंबर जनसेवा समितीचे अध्यक्ष नरसगोंडा पाटील, कुपवाड विकास सोसायटी चेअरमन संजय पाटील, राज्य युवा अध्यक्ष सुमित पाटील, माजी चेअरमन प्रमोद पाटील, माजी नगरसेवक प्रशांत पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर, कुमार लोकापुरे, सुरगोंडा पाटील, आदगोंडा पाटील, मलगोंडा गोंडाजे, नितीन लोकापुरे, अनिल पाटील, शीतल पाटील, देशभूषण कर्नाळे, कुलभूषण कर्नाळे, चेतन आवट, शफिक बुरान, साहेबउद्दीन मुजावर, सन्मती गोंडाजे यासह आदी उपस्थित होते.