| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ नोव्हेंबर २०२४
सांगली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा अर्थात महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचारामध्ये गाडी घेतली असून, त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे. त्यामुळे सुधीरदादा यंदा हॅट्रिक करणार असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात केलेला विकास, त्यांची स्वच्छ प्रतिमा, समाजातील प्रत्येक घटकाशी असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध, त्यांचा कार्यालयात आलेल्या नागरिकांना मिळत असलेला आपुलकीचा अनुभव, कार्यकर्त्यांचे मोठे मोहोळ, भारतीय जनता पक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठीमागे असलेली शक्ती ही सारी सुधीरदादांच्या जमेची बाजू आहे.
आणि म्हणूनच सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. शिवाजी तथा पप्पू डोंगरे यांची बंडखोरी आ. सुधीरदादांच्या विजयाचा अडसर ठरण्याची शक्यता कमी असल्याचे, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ठामपणे सांगण्यात येत आहे. उलट श्री. बंडखोरी सुधीरदादांपेक्षा श्री. पृथ्वीराज पाटील यांच्यासाठीच धोकादायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात विधानसभेत किती प्रश्न उपस्थित केले ? या आरोपाला उत्तर देताना, आ. गाडगीळ यांनी म्हटले आहे की, अपवाद वगळता महायुतीची सत्ता महाराष्ट्रात होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून विधानसभेत प्रश्न मांडण्याऐवजी, सांगली विधानसभा मतदारसंघात कोट्या विधी रुपयांचा निधी आणि त्यातून झालेली विकास कामे ही महत्त्वाची आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघातील सूज्ञ मतदारांना याची जाणीव आहे. त्यामुळे विरोधकांच्या या आरोपाला काहीच अर्थ नाही. विधानसभेत मी किती प्रश्न उपस्थित केले यापेक्षा, माझे डोंगराइतके कामच माझ्या विजयासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
सांगली शहराला जोडणाऱ्या तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलाचा उल्लेख करून, आ. सुधीरदादा म्हणाले की, हरिपूर येथील कृष्णा नदीवरील पुलामुळे कोल्हापूरचे आणि शिरोळ, हातकलंगले तालुक्यातील अनेक गावांचे सांगली शहराशी असलेले नाते अधिक दृढ झाले आहे. या दोन तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना या पुलाचा अधिक फायदा झाला आहे. त्याप्रमाणे आयर्विन पुलाला उत्तम पर्याय ठरणाऱ्या नवीन पुलाचाही सांगली शहरातील व्यापार वाढण्यास मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे ही बाबही विधानसभा निवडणुकीत प्रभावी ठरत आहे.
भाजपातील नाराजांचा उल्लेख करून आ. सुधीरदादा म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी मी विधानसभा निवडणुकीत माघार घेतल्यानंतर, येथे इच्छुकांची संख्या वाढली होती. मात्र पक्षाने माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर, मी स्वतः या सर्वांची भेट घेतली आहे. आमचे नेते ना. चंद्रकांतदादा पाटील यांनीही या सर्व इच्छुकांची भेट घेऊन असलेली नाराजी दूर केली आहे. त्यामुळे नाराजांचा विषय केव्हाच मागे पडला आहे. आता या साऱ्यांची एकत्रित ताकद माझ्या व पक्षाच्या मागे ठामपणे उभी आहे.
एकंदरीत भाजपा पक्षातून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून, मतदारातून मिळणारा पाठिंबा यामुळे आ. सुधीर दादांचे कार्यकर्ते रिचार्ज झाले असून या साऱ्यांनीच त्यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. विजयाचा गुलाल सुधीरदादांनाच लागणार असा विश्वास सर्वांकडून व्यक्त होत आहे.