yuva MAharashtra तासगावमधील पैसे वाटप प्रकरणी गुन्हा, संजयकाकांचा रोहित पाटलावर आरोप, तर रोहित पाटलांकडून पलटवार !

तासगावमधील पैसे वाटप प्रकरणी गुन्हा, संजयकाकांचा रोहित पाटलावर आरोप, तर रोहित पाटलांकडून पलटवार !


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. ४ नोव्हेंबर २०२
काल रात्री तासगाव येथे साठे नगर मध्ये एका व्यक्तीला बरोबर पैसे वाटप करीत असताना संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी पकडले, त्याचा व्हिडिओही केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी या प्रकाराबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आर आर आबांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्यावर आरोप केला असून, नागरिकांना पैशाचे अनिश दाखवून मते विकत घेण्याचा प्रकार सुरू असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान रोहित पाटील यांनी याप्रकरणी आपला काहीही संबंध नसल्याचे व आपल्याला विनाकारण बदनाम करण्यात येत असल्याचा खुलासा केला आहे. याबाबत बोलताना रोहित पाटील म्हणाले की स्व. आर आर आबा पाटील यांना अशाच प्रकारे बदनाम करण्यात येत होते. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकवून त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न होत होता. अशी प्रतिक्रिया देऊन रोहित पाटील म्हणाले की तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघात गेल्या दोन-तीन दिवसापासून कोण फराळ वाटप करत आहे असा सवालही त्यांनी केला आहे. ज्या व्यक्तीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे, त्या व्यक्तीवर दबाव आणून जबरदस्तीने माझे नाव वदवून घेत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सहज लक्षात येते.


काल रात्री तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात, किंबहुना संपूर्ण जिल्ह्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांच्यासाठी हे पैसे वाटप करीत असल्याचे सांगत आहे. सुमारे 227 जणांची यादी करण्यात आली असून त्यातील शंभर लोकांना तीन हजार रुपये प्रमाणे पैसे वाटप करण्यात आल्याचे हा तरुण कार्यकर्ता व्हिडिओमध्ये सांगत आहे. या प्रकारानंतर संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान हा प्रकार म्हणजे अजित पवार यांनी स्व. आर आर आबा यांना विनाकारण बदनाम केल्यामुळे मतदार संघात संजय काका पाटील यांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळेच हा प्रकार घडवून आणण्याचा आरोप होत आहे.