Sangli Samachar

The Janshakti News

ऐन दिवाळीत तेलासह डाळींचे दर भडकले, सर्वसामान्यांच्या आनंदाला महागाईची किनार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑक्टोबर २०२४
दिवाळी म्हटलं की, तेल आणि विविध प्रकारच्या डाळी यांचं जणू समीकरणच. परंतु गेल्या काही वर्षात ऐन दिवाळीत तेल आणि डाळी यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या आनंदाला ग्रहण लागत आहे. हा दरवाढीचा सिलसिला यावर्षीही सुरूच असून यंदा वाढलेल्या दराच्या साहित्यातून दिवाळी साजरी करीत असताना नागरिकांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.

"दिवाळी सण मोठा नाही आनंदाचे तोटा" असे आपल्याकडे म्हटले जाते. त्याबरोबरच "ॠण काढून सण" अशी ही एक म्हण प्रचलित आहे. एकीकडे केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना पगार वाढवावी बरोबरच वाढीव बोनस मिळाला असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण असले तरी, वाढत्या महागाईमुळे या आनंदाला ब्रेक लागला आहे. तर दुसरीकडे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मात्र मिळणाऱ्या पगार व नाममात्र बोनस यावरच दिवाळी साजरी करावी लागणार आहे.


लाडक्या बहिणी योजनेमुळे महिलांच्या बँक खात्यात साडेसात हजार रुपये जमा झाले असले तरी ही रक्कम वाढत्या महागाईमुळे तुटून बीच ठरणार आहे. परिणामी मुख्यमंत्री यांच्या भाऊबीजेचा आनंद अल्पजीवी ठरत आहे. या साऱ्यांचा मेळ घालत महिलावर्ग फराळाच्या तयारीला लागला आहे. बाजारपेठेचा अंदाज घेता, या फराळासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दर गगनाला भेटलेले असल्याचे जाणून येते.

गतवर्षी फराळातील लागणाऱ्या चारोळीचा दर 1700 ते 1800 रुपये किलो होता, यंदा तो 2200 रुपये आहे
 हरभरा डाळ 45-50 रुपये वरून 110 रुपये वर पोहोचली आहे. हा दर दिवाळीपूर्वी 65 ते 70 रुपये किलो होता. यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तेल त्याचा दर दिवाळी पूर्वीपासूनच दीडशे रुपयांच्या आसपास पोहोचला आहे. परिणामी यंदाची दिवाळी आनंददायी ठरणार का असा प्रश्न निर्माण होतो.