Sangli Samachar

The Janshakti News

होय, मी पतंगराव कदम यांना खूप त्रास दिला, खा. विशाल पाटील यांची जाहीर कबूली !


| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. २९ ऑक्टोबर २०२
कदम कुटुंबाने गेल्या ५० वर्षात लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी वहिनी, लाडकी आजी जपली आहे. महाराष्ट्रात सत्ता बदल होईल, आणि त्याचे नेतृत्व विश्वजीत कदम करतील. पलूस कडेगांव मतदारसंघातील निवडणूक एकतर्फी करून महाराष्ट्रातील सर्वात जास्त फरकाने विश्वजीत कदम यांना निवडून द्यायचं आहे. बर आहे आपला नेता निवडला आहे, पायलट कुठे नेतो तिकडे जायचं, अशा शब्दात खासदार विशाल पाटील यांनी आमदार विश्वजित कदम यांच्यावर जोरदार स्तुतीसुमने उधळली.


विशाल पाटील यांनी आमदार शहाजी बापू पाटलांच्या प्रसिद्ध डायलॉगची कॉपी सुद्धा केली. ते म्हणाले की, कडेगावमधील विश्वजीत कदम यांच्या रॅलीत काय ती लोकं, काय त्या गाड्या, काय त्या घोषणा, एकदम ओके.

विशाल पाटील म्हणाले की, मला उशिरा का होईना यश मिळाले. मी पतंगराव कदम यांना खूप त्रास दिला होता, असे सांगत खासदार विशाल पाटील यांनी जाहीर कबूली दिली. ते म्हणाले की, आता विश्वजीत कदम यांच्याकडे नेतृत्व आल्यावर माझं काही खरं नाही असं मला वाटत होतं. विश्वजीत कदम यांना स्वतःच्याच घरातील खासदार करता आला असता. वडिलांना त्रास दिलेल्याचा राग काढता आला असता. पण मी विश्वजीत कदम यांच्याकडे उडी मारून विश्वजीत यांच्या पूर्णच प्रेमात पडलो असल्याचे ते म्हणाले.