Sangli Samachar

The Janshakti News

पोलिसांची दिवाळी यंदा विधानसभा निवडणुकीमुळे बंदोबस्ताच्या ठिकाणी साजरी होणार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ ऑक्टोबर २०२४
पोलीस म्हटलं की '24 तास ऑन ड्युटी' कधी कुठली गंभीर घटना घडेल, कधी एखादा व्हीआयपीच्या बंदोबस्तासाठी ड्युटी जॉईन करावी लागेल, कधी कोणत्या ठिकाणी अचानक जावे लागेल; याची शाश्वती देता येत नाही. परिणामी नेहमीच त्याला वेळेच्या बंधनाशिवाय तणावयुक्त नोकरी करावी लागत असते. यंदा गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर पोलिसांना दिवाळी ही बंधू बसतात साजरी करावी लागणार आहे.

पोलिसांच्या सुट्ट्या, रजा 25 नोव्हेंबर पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांना आपल्या कुटुंब प्रमुखाशिवाय दिवाळीचा आनंद (?) साजरा करावा लागणार असल्याने काही नाराजीचा सूर उमटत आहे. मात्र पोलिसांना कुटुंबीयांच्या आनंदापेक्षा कर्तव्य महत्व असल्यामुळे, आपल्या दिवाळीच्या आनंदावर विरजण सोडावे लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन महिने पोलिसांना बंदोबस्तात व्यतीत करावे लागले. काही काळ जातो तोच पुन्हा गणेशोत्सव आणि नवरात्रीचा सण आल्याने, पुन्हा बंदोबस्तावर तैनात व्हावे लागले. आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अंगावर खाकी वर्दी चढवून पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी जावे लागणार आहे. 


निवडणुकीचा काळ म्हटले की, इतर सगळ्यापेक्षा ताणतणावाचा असतो. विविध पक्ष, गट तट यातून हमरी तुमरीचे प्रसंग उद्भवतात. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांना सतर्क रहावे लागते. प्रसंगी काठीही हाती घ्यावी लागते. मग समोर आपला ओळखीचा आहे की नातेवाईक, हे न पाहता शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागते.

कालपासून उमेदवारी अर्ज भरण्याची गडबड सुरू झाली असून, आता निकालाच्या दिवसापर्यंत पोलिसाला दक्ष राहावे लागणार आहे. एकीकडे दिवाळीचा बंदोबस्त तर दुसरीकडे निवडणूक शांतता पार पाडण्यासाठी रात्रंदिवस कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ड्युटीवर तैनात करावे लागणार आहे. 

पोलीस महासंचालकांनी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत हक्काच्या रद्द करण्यात आल्या असल्या तरी वैद्यकीय आणि अत्यावश्यक कारणासाठीच रजा घेता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात जवळपास सहा हजारांवर अधिक पोलीस, होमगार्ड, राज्य राखीव दलाचे पोलीस यांचा बंदोबस्त राहणार आहे.