yuva MAharashtra दाभोळकर हत्या प्रकरणातील निर्दोष सुटलेले श्रीकांत पांगारकर शिंदे शिवसेनेत डेरेदाखल !

दाभोळकर हत्या प्रकरणातील निर्दोष सुटलेले श्रीकांत पांगारकर शिंदे शिवसेनेत डेरेदाखल !



| सांगली समाचार वृत्त |
जालना - दि. १८ ऑक्टोबर २०२४
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आणि विद्रोही चळवळीतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या श्रीकांत पांगारकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


दाभोळकर हत्या प्रकरणाबरोबरच नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणीही एटीएसने त्यांच्यावर कारवाई केली होती. जालना येथील राणा ठाकूर यांच्या रेवगावच्या फार्म हाऊसवर मराठवाड्यातील पिस्तूल चालवणे आणि गावठी बॉम्ब बनवण्याचे तसेच नालासोपारा शस्त्रासारखा प्रकरणी रसत पुरवल्याचा आरोप पांगारकर यांच्यावर आहे. परंतु न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच त्यांची पुरेशा पुराव्या आभावी निर्दोष मुक्तता झाली होती.

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या हस्ते पांगारकर यांना शिवबंधन बांधण्यात आले. यानंतर त्यांच्यावर जालना विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी ही सोपवण्यात आली आहे. दाभोळकर खून प्रकरणासारख्या गंभीर प्रकरणात शिक्षा भोगून आलेले पांगारकर आता शिंदे शिवसेनेला बळ देणार का ? की ते शिंदे शिवसेनेच्या विजय पदपथावर अडथळा ठरणार ? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.