| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
सर्व स्तरावरील महिलांचा विकास आणि प्रगती हेच राज्यातील महायुती शासनाचे ध्येय आहे. त्यामुळेच महिलांसाठी विविध योजना शासनाने जाहीर केल्या आहेत अशी माहिती सौ. मंजिरीताई सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. सौ. गाडगीळ या भारतीय जनता पार्टी सांगली विधानसभा क्षेत्र व आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडून पद्माळे, कर्नाळ, आणि बुधगाव येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्ती महामेळाव्यात बोलत होत्या. आमदार सुधीरदादा गाडगीळ हेही यावेळी उपस्थित होते.
सौ मंजिरी ताई व सुदिक दादा घाडगे यांचे प्रत्येक गावात महिलांनी जोरदार स्वागत केले. या महामेळाव्यासाठी हजारो महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिलांनी सौ. गाडगीळ व आ. सुधीरदादा गाडगीळ यांचे औक्षण केले व सुधीर दादा कायमच त्यांच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहिले आहेत. त्यामुळे हक्काचे भाऊ म्हणून हा सुधीरदादांना महिलांनी राख्याही बांधल्या.
यावेळी अनेक महिलांनी महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सारख्या अनेक विकासाच्या योजना राबविल्याबद्दल भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील त्यांच्या सर्व सहका-यांबरोबरच आ. सुधीरदादा गाडगीळ यांचे आभार मानले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आ. सुधीरदादा गाडगीळ म्हणाले की, महिलांचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने समाज स्वयंपूर्ण आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होईल, त्यामुळेच महायुती शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांनी त्यांच्या गावात सुधीरदादा गाडगीळ यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती दिली आणि त्याबद्दल त्यांचे आभार मानले.