Sangli Samachar

The Janshakti News

सांगली शहरातील या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याचे महापालिकेतर्फे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑक्टोबर २०२४
सांगली शहर पाणी पुरवठा योजना अंतर्गत माळबंगला 56MLD जलशुद्धीकरण केंद्र येथील फिल्टर हाऊसचे प्युअर वॉटर ड्रेन पाईप दुरुस्ती करणेचे महत्वाचे काम मंगळवार दि.१५/१०/२०२४ रोजी सकाळ पासून केंद्राचा पाणी पुरवठा बंद ठेवून हाती घेणेत येणार आहे. सदर मोठ्या स्वरूपाचे दुरुस्ती विषयक काम युद्धपातळीवर करणेचे नियोजन केले असुन,या केंद्राच्या ठिकाणच्या दुरुस्ती कामास विलंब होऊ शकणार आहे.

यामुळे बुधवार दि.१६/१०/२०२४ रोजी सकाळ वेळेत या झोनमधील माळबंगला, आर टी ओ, संजयनगर, यशवंतनगर, आपटा पोलीस चौकी, वसंत कॉलनी, जयहिंद कॉलनी आणि वाल्मिकी आवास या टाक्या मधून अपुरा व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे. नागरिकांनी कृपया याची नोंद घेऊन, मिळणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन सांगली महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. एस. कुरणे यांनी केले आहे.