| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ ऑक्टोबर २०२४
ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा समाजाच्या मुला मुलींच्या आर्थिक सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काम करत असताना, स्वतःवरच गोळ्या झाडून घेतल्या व मराठा समाजासाठी बलिदान दिलेले स्व. आदरणीय अण्णासाहेब पाटील साहेब यांच्या नावाने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्याच नावाने सुरू करण्यात आलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सांगलीच्या ऑफिससाठी जागाच नाही. यासाठी प्रवक्ते संतोष पाटील व त्याच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले.
यासंबंधीचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या युवकांना त्यांचा उद्योग व्यवसायासाठी 800 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले व त्यावरील 80 कोटी व्याज परतावा दिला गेला आहे. यामध्ये अनेक चांगले उपक्रम घडत आहेत. अशा या अतिमत्त्वाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला सांगलीमध्ये स्वतंत्र जागा नसावी ही शोकांतिकाच आहे. यासाठी आम्ही विजयनगर येथे प्रशासकीय इमारतीत सद्या सुरू असलेल्या ऑफिसमध्ये भेट दिली व त्या ठिकाणची माहिती घेतली, त्यावेळेला असे समजले की, हे ऑफिस दुसऱ्यांच्या ऑफिसमधून सध्या चालू आहे. उद्योजक बनणाऱ्या होतकरू व जे उद्योजक बनू पाहत आहेत, अशा युवकांसाठी या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र जागा ऑफिस साठी देण्यात यावी. जेणेकरून रोज शेकडो युवक, युवती येत असतात व ज्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज पाहिजे व माहिती घेण्यासाठी व अनेक हजारो नागरिक रोज येत असतात. परंतु सध्या महामंडळाचा कारभार दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये असल्यामुळे कुचंबना होत आहे.
या महामंडळाचा कारभार हा सध्या जिल्हा रोजगार,विकास उद्योजकता व कौशल्य विभागाच्या ऑफिसमधून कारभार चालत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ऑफिसमध्ये गेल्यावर कोणाचे ऑफिस आहे हेच काही कळत नाही. त्यामुळे लवकरात लवकर आम्ही या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र ऑफिस देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.
या शिष्टमंडळात मा. शिवाजी लाड, विश्वास पाटील, रोहित शिंदे, शिवाजी मोहिते व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.