| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ सप्टेंबर २०२४
रेल्वे प्रशासनाने 10 सप्टेंबर पर्यंत पंचशील नगर रेल्वे उड्डाण पुलावरून एक मार्गी वाहतूक सुरू करण्याचे आश्वासन मागील महिन्यात दिले होते. परंतु काल केलेल्या पाहणीनुसार 30 सप्टेंबर पर्यंतही, हा उड्डाणपूल सुरू होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे नागरिक जागृती मंच व सर्व पक्ष कृती समिती सांगली जिल्हा यांच्यावतीने पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे, रेल्वेचे अधिकारी श्री पाखरे साहेब यांच्या मुंबईतील निवासस्थाना समोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानंद यांनी 30 ऑगस्ट 2014 पर्यंत सदर कामाची मदत असल्याने एका अधिसूचनेद्वारे हा रस्ता बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर हा रस्ता बंद करण्याची वाढीव मुदतीची आधी सूचना प्रसिद्ध करण्यात आली नसूनही हा रस्ता अद्याप बंद कसा ? हे बेकायदेशीर नाही का आणि असल्यास जिल्हा प्रशासन संबंधितांवर काय कारवाई करणार असा प्रश्न या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
नागरिक जागृती मंचच्या वतीने केलेल्या पाहणीत माधवनगर कडील बाजूचा भराव पूर्ण झालेला आहे, मात्र मुख्य स्लॅबच्या ठिकाणी स्वच्छता व अन्न कामे बाकी आहेत. त्याचप्रमाणे सांगलीकर च्या बाजूकडील 50 टक्के भराव पूर्ण झाला आहे मात्र अजूनही 50 टक्के भराव बाकी आहे बरीचशी कामे या बाजूकडील अपूर्ण आहेत. त्यामुळे तीस सप्टेंबर पासूनही एकेरी वाहतूक सुरू होण्याची कोणतीही शाश्वती नाही.
☝️ पुलाच्या कामाचा व्हिडिओ ! ☝️
27 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खा. विशाल पाटील यांनी एक बैठक आयोजित केलेली होते. मात्र महापूर सदृश्य परिस्थितीमुळे सदर बैठक रद्द झाली. त्यानंतर या बैठकीसाठी कोणतीही हालचाल अद्यापही दिसत नाही. पालकमंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी हे या कामाबाबत अनभिज्ञ आहेत. कोणीही कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. केवळ माजी आमदार नितीन शिंदे, पै. पृथ्वीराज पवार आणि सर्वपक्षीय कृती समिती व नागरिक जागृती मंच यांच्या वतीनेच वारंवार जागेवर जाऊन पाहणे करून काम वेगाने होण्याबाबत आंदोलने करीत आहोत. बेकायदेशीररित्या रस्ता बंद केल्या बाबत आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करणार आहोत त्याचप्रमाणे पालकमंत्री यांना सुरेश भाऊ खाडे यांच्या विश्रामबाग येथील निवासस्थानासमोर तसेच रेल्वेच्या अधिकारी श्री पाखरे साहेब यांच्या मुंबई येथील निवासस्थानासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. असा इशारा एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सतीश साखरकर, उमेश देशमुख, शंभूराज काटकर, गजानन साळुंखे, संतोष पाटील, अजित सूर्यवंशी, नितीन चव्हाण, आसिफ बावा, युसुफ उर्फ लालू मिस्त्री, कयूम पटवेगार, महालिंग हेगडे, प्रकाश निकम, सचिन देसाई, जयदीप शेंडगे यांनी दिला आहे.