Sangli Samachar

The Janshakti News

वसंतदादा कारखान्याच्या माध्यमातून हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारण्याचा विचार - खा. विशाल पाटील यांची घोषणा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ सप्टेंबर २०२४
सध्या वसंतराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मधून 1000 पेक्षा अधिक तरुण इंजिनिअर म्हणून देश विदेशात नोकरीच्या माध्यमातून वार्षिक करोडो रुपयांचा पगार घेत आहेत, तर काहींनी स्वतःचा उद्योग उभारला आहे. त्यामुळे आता फक्त साखर उत्पादनापुरतेच मर्यादित न राहता कारखान्याच्या माध्यमातून कारखाना कार्यस्थळावर हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज काढण्याचा मानस वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन खा. विशाल पाटील यांनी बोलून दाखविला. ते वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

सभासद शेतकरी व गरजू गरीब लोकांना सवलतीच्या दरात उपचार मिळतीलच परंतु त्यांच्या मुलांना उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण मिळण्याचा पर्याय उपलब्ध होईल, असे सांगून खा. पाटील म्हणाले की, माझ्या लोकसभा निवडणुकीच्या विजयात सभासद व कामगारांचा मोलाचा वाट आहे. यंदाच्या वर्षापासून सभासदांना देण्यात येणारी साखर दसऱ्यापूर्वी देणार असून, सभासदांची दसरा व दिवाळी गोड व्हावे असा आमचा प्रयत्न असेल. वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांची आडवणूक करून कोणी जादा पैसे घेतल्यास त्याबाबत संबंधित आणि लेखी तक्रार केली तर ते पैसे त्याच्या बिलकुल कपात करून शेतकऱ्यांना परत देऊ. त्याचप्रमाणे परतीच्या ठेवीतून शेअर्स रक्कम घेण्यासही संमती दिली जाईल, असेही खा. विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले.


विशाल पाटील हे खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेल्याने, त्यांच्या अभिनंदनचा ठराव सभासदांतर्फे श्री मिलिंद खाडीकर यांनी मांडला. तर प्रा. डी. ए. पाटील यांनी सत्कार केला. कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले त्या सर्व सभासदांनी एक मुखाने मंजुरी दिली. शेवटी संचालक अमित पाटील यांनी आभार मानल्यानंतर केळीमेळीच्या वातावरणातील सभेचे कामकाज संपन्न झाले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील आवटी, श्री. सिकंदर जमादार, उदय पवार, रघुनाथ पाटील कर्नाळकर, जि. प. सदस्य सुनील पाटील, जि. प. विशाल चौगुले, मार्केट कमिटीचे संचालक शशिकांत नागे, दिलीप वग्यानी, शिवसेनेचे बजरंग पाटील त्याचप्रमाणे सर्व संचालक व सभासद वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.