| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ सप्टेंबर २०२४
मा.आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली दि.०९/०९/२०२४ रोजी मंगलधाम येथे सकाळी १०.०० वा. सर्व नियंत्रण अधिकारी, सर्व उपायुक्त, सर्व विभागप्रमुख यांच्या समवेत आढावा बैठक आयोजित केली होती . सदर बैठकीत GRC शासकीय पत्रव्यवहार, तसेच मागील बैठकीच्या इतिवृत्तामधील दिलेल्या निर्देशाप्रमाणे केलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार होता , त्याचबरोबर प्रशासकीय महासभा व स्थायी समिती सभा देखिल आयोजिकरण्यात आली होती.
या बैठकीस उपस्थित राहण्याबाबत सर्वाना सूचना देण्यात आल्या होत्या. सदर बैठकीस पृथ्वीराज चव्हाण, शहर अभियंता, नकुल जकाते, सिस्टीम मनेजर, डॉ. रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी , हे विहित वेळेत उपस्थित होते. तसेच श्री. अमर चव्हाण, विद्युत अभियंता, श्री. वैभव वाघमारे, प्र. उप अभियंता मान्यता घेऊन अनुपस्थित होते. मात्र आयुक्तांची मान्यता अथवा पूर्वकल्पना न देता वरील नमूद विभाग प्रमुख वगळून जे नियंत्रण अधिकारी, विभागप्रमुख बैठकीस विहित वेळेत उपस्थित नव्हते अशा अधिकारी यांना शास्ती म्हणून त्यांची १/२ दिवस किरकोळ रजा मा आयुक्त यांनी खर्ची टाकण्याचे आदेश दिले आहेत. या पुढे वेळेत उपस्थित राहणार नाहीत त्यांच्या विनानोटिस कारवाई होणार आहे असे सूचित केले आहे.