| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० सप्टेंबर २०२४
दिनांक ०७.०९.२०२४ ते १७.०९.२०२४ या कालावधीत हिंदु धर्मियांचा गणेशोत्सव उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव अनुषंगाने पोलीस ठाणे, उपविभागीय तसेच जिल्हा स्तरावर गणेश मंडळे, शांतता समिती, मोहल्ला कमिटी, पोलीस मित्र, प्रतिष्ठीत नागरिक यांच्या बैठका घेण्यात आलेल्या होत्या. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक गांव एक गणपती साजरा करणाऱ्या गणेश मंडळ गावांना विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेंच मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली व श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी गणेश उत्सव मंडळांना एक गांव एक गणपती व एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना राबविणेबाबत आवाहन केले होते. त्यास सांगली जिल्हयातील खालील गावांनी प्रतिसाद देवून एक गांव एक गणपती ही संकल्पना राबविली आहे.
मागील वर्षी जिल्हयातील ५७ गावांनी एक गांव एक गणपती ही संकल्पना राबविली होती यावर्षी त्यात वाढ होवून एकूण ७९ गावांनी ही संकल्पना राबविली असून त्या गावांची पोलीस ठाणेनिहाय नांवे पुढील प्रमाणे. सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील नावरसवाडी, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील रसुलवाडी, कुंडल पोलीस ठाणे हद्दीतील घोगांव भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील भिलवडी स्टेशन, विटा पोलीस ठाणे हद्दीतील ऐनवाडी, पोसेवाडी, धोंडगेवाडी, जाखिनवाडी, ढोराळे, आडसरवाडी, भिवघाट, करंजे, हिवरे, कुसबावडे, ताडाचीवाडी, बाणुरगड, धोंडेवाडी, मोही, रामनगर, भडकेवाडी, सुलतानगादे, बेणापूर, भुड, कळंबी, आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील कामथ, बोंबेवाडी, गोमेवाडी, मिटकी, घुलेवाडी, मासाळवाडी, मुढेवाडी, घरनिकी, कानकात्रेवाडी, तनपुरेवाडी, आंबेवाडी, औटेवाडी, गुळेवाडी, कुरंदवाडी, कडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील येडे, रेणुसेवाडी, तुपेवाडी, तासगांव पोलीस ठाणे हद्दीतील पाडळी, कचरेवाडी, चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील वाजेगाव, सोनसळ, इस्लामपुर पोलीस ठाणे हद्दीतील फारणेवाडी, शिराळा पोलीस ठाणे हद्दीतील आंबेवाडी, अस्वलेवाडी, बेलेवाडी, उपवळे, अंत्री बुद्रूक, कोकरुड पोलीस ठाणे हद्दीतील किनरेवाडी, मोहरे, खुंदलापूर, कदमवाडी, जत पोलीस ठाणे हद्दीतील गुगवाड, व्हसपेठ, मल्हाळ, साळमाळगेवाडी, अमृतवाडी, पाच्छापूर, कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीतील ढालगाव, अग्रण धुळगाव, घाटनांद्रे, पिंपळवाडी, म्हैशाळ एम, करलहट्टी, सराटी, वाघोली, चुडेखिंडी, गर्जेवाडी, उमदी पोलीस ठाणे हद्दीतील मोटेवाडी तुर्क, जालीहाळ, अंकलगी, जालीहाळ खुर्द, भिवर्गी, मायथळ, आंबाचीवाडी तसेच कासेगाव पोलीस ठाणे हद्दीतील धोत्रेवाडी अशा ७९ गावांनी यावर्षी एक गांव योजनेत सहभाग नोंदवला आहे.
एक गांव एक गणपती ही संकल्पना राबविणाऱ्या गावातील नागरिकांचे तसेच त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी यांचे मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी आभार व्यक्त केले असून गणेश मंडळांनी असे पर्यावरण पुरक नाविण्यपुर्ण उपक्रम राबवावेत असे अवाहन केले आहे.