Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'गुजरात पॅटर्न'ची चर्चा, अमित शहा यांच्या दौऱ्याने विद्यमान आमदारांची उडाली झोप !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २८ सप्टेंबर २०२४
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. 27 पैकी केवळ 9 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आल्याने, भाजपाचे केंद्रीय नेतृत्व सतर्क झाले आहे. अवघ्या महिन्याभरात वर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा अनेकांच्या पोटात गोळा आणणारा ठरला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय गृहमंत्री व भाजपा हायकमांड अमित शाह संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच त्यांनी नागपूर येथे भाजपा नेते व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केले होती. यावेळी उपस्थित त्यांना स्वानुभव सांगून शाह म्हणाले की, 2022 मध्ये मतदारांचे भाजपवर प्रचंड नाराजी होते त्यामुळे आमदारांपैकी तब्बल 58 आमदारांचे तिकीट कापले गेले होते ज्यामध्ये माझेही नाव होते. तेव्हा पक्षाध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे हे गुजरात दौऱ्यावर होते. मी दुःखी असल्याचे समजल्याने, त्यांनी मला पक्षाचा अजिबात प्रचार करू नकोस असे सांगितले. दुःखी माणूस कोणतेही चांगले काम करू शकत नाही, असे ठाकरे यांनी आपल्याला सांगितल्याचे शहा म्हणाले. एखाद्या व्यक्तीचे तिकीट कापल्यानंतर घरी जाऊन समजूत काढावी लागत असेल तर तो कार्यकर्ताच नाही, असेही ठाकरे यांनी माझ्याशी बोलताना सांगितले. 


अमित शाह यांचा हा अनुभव नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगण्यामागे नेमका काय मतितार्थ दडला आहे ? दरम्यान ज्या आमदारांची कामगिरी चांगली नाही, किंवा ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत अशा आमदारांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा आता भाजपा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा नव्या चेहऱ्यांना समोर आणण्याची वर्तवण्यात येत आहे.