| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ सप्टेंबर २०२४
मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर, यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांचे वतीने अल्पवयीन बालकांसंदर्भात कॉमन मिनीमम कार्यक्रम, नविन कायदेविषय मार्गदर्शन, चित्रप्रदर्शन तसेच महिला सुरक्षा, निर्भया पथक कामकाज, स्वसंरक्षण प्रात्यक्षिक सादरीकरणाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात आले होते. तसेच सांगली जिल्हयामध्ये निर्भया पथकांचेमार्फतीने वेगवेगळया प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सांगली उपविभागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, आण्णासाहेब जाधव, यांचे मार्गदशर्नाखाली मपोउपनि मोनाली पाटील यांनी मुलांना त्यांचे करियरबददल गुड टच बॅड टच, गुड हॅबीट बॅड हॅबीट, नवीन कायदे, टोल फ्री नं १०९८, ११२ वर संपर्क करणेबाबत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणेबाबत शाळा, कॉलेज, या ठिकाणी मार्गदर्शन केले. मिरज उपविभागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रणिल गिल्डा, मपोउपनि मिनाक्षी माळी यांनी मिरज येथे श्रीकांत चौक, गांधी चौक, लक्ष्मी मार्केट, वालचंद कॉलेज समोर महिलांवर होणारे अत्याचार तसेच सेल्फ डिफेन्स वर आधारीत पथनाटयाचे सादरीकरण करण्यात आले.
इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगेश चव्हाण, यांचे मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गायकवाड यांनी वेगवेगळ्या शाळांमध्ये जावुन पॉम्पलेट दिले. बसस्थानक, वसतीगृह येथे पॉम्पलेट लावणेत आले आहेत. बसमधून प्रवास करणा-या मुलींना समुपदेशन करण्यात आले. विटा उपविभागीय पोलीस अधिकारी, विपुल पाटील, यांचे मार्गदर्शनखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पुजा महाजन यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत व दक्षता घेणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जत उपविभागीय पोलीस अधिकारी, सुनिल साळुंखे, यांचे मार्गदर्शनखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा नारायणकर यांचे वतीने प्रत्येक शाळेमध्ये सी.सी.टी.व्ही बसवणेबाबत सुचना देण्यात आल्या. मुलींना मुलभूत अधिकार, स्वत:चे स॔रक्षण कसे करावे, या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सांगली जिल्हयातील निर्भया पथक अधिकारी मोबाईल नंबर सांगली निर्भया पथक प्रमुख मपोउपनि मोनाली पाटील - मो.नं ९३०७५११०१८, मिरज निर्भया पथक प्रमुख मिनाक्षी माळी - मो.नं ९३०७५०१९०७, इस्लामपूर निर्भया पथक प्रमुख पोउपनि गायकवाड - मो. नं. ९३०७५२०३००, तासगाव निर्भया पथक प्रमुख पोउपनि घोरपडे - मो.नं ९३०७५००३४८, विटा निर्भया पथक प्रमुख मपोउपनि पुजा महाजन मो. नं. - ९३०७६८२८४४, जत निर्भया पथक प्रमुख मपोउपनि नारायणकर - मो. नं. ७४९८२८२८८३ या मोबाईल नंबरवर कॉल करणेबाबत मुलींना तसेच महिलांना कोणी त्रास देत असलेस कोणालाही न घाबरता पुढे येऊन तक्रार देणेबाबत, मुलींना त्यांचेवर होत असलेला अन्याय सहन न करता पुढे येऊन तक्रार देणेबाबत तसेच त्यांचे नाव गोपणीय ठेवणेत येणार असलेबाबतचे आवाहन सांगली जिल्हा निर्भया पथक नोडल अधिकारी श्रीमती रितू खोखर यांनी केले आहे.
सन २०२४ मध्ये सांगली जिल्हयामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार ३५६२ जणावर कारवाई करण्यात आलेली आहे. निर्भया पथकाकडील प्राप्त तक्रारीनुसार भा.द.वि.स कलम ३५४ प्रमाणे ७ गुन्हे दाखल केले आहेत. मोटार वाहन कायदा कलम/ई चलन १२१ केसेस १,१०,४०० रु. दंड तसेच ६४ खटले, १४,८००/- दंड कोर्टात पाठविलेले आहेत. प्रबोधनपर कार्यक्रम ३९३ घेण्यात आले आहेत. सन २०२४ मध्ये ३५६२ जणाचे समुपदेशन करण्यात आले आहे. याप्रकारे सांगली जिल्हा पोलीस अंतर्गत निर्भया पथक वेळोवेळी शाळा, कॉलेज, महाविदयालय, गर्दीची ठिकाणे, बागबगीचा, बसस्थानके, रेल्वे स्टेशन इ. ठिकाणी पेट्रोलिंग करून सेल्फ डिफेन्स प्रबोधनात्मक पथनाटय तसेच महिला व बालंक सुरक्षा कार्यक्रम आयोजित करून महिला व बालंकाच्या सुरक्षेसाठी सदैव दक्ष आहोत.