Sangli Samachar

The Janshakti News

कडेगाव येथील महाआघाडीच्या शक्ती प्रदर्शनाकडे उद्धव ठाकरे यांनी फिरवली पाठ ? नेत्यांच्या खुमासदार भाषणाची उत्सुकता !


| सांगली समाचार वृत्त |
कडेगाव - दि. ५ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत नेते व माजी मुख्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या कडेगाव येथील पूर्णाकृती पुतळा अनावरणाच्या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेना आज शक्तीप्रदर्शनासाठी एकत्र येणार आहे. परंतु या सभेकडे उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. उद्धव ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 'मुख्यमंत्र्यांचा चेहरा' घेऊन सामोरे जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ठाकरे यांना सहमती मिळत नाही. याच मुद्द्यावरून ठाकरे यांनी नाराज असल्याने या सगळीकडे पाठ फिरवली आहे.

दरम्यान शिक्षण क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कडेगाव येथील स्व. डॉ. पतंगराव कदम यांचा पुतळ्याचे अनावरण व हाती भव्य सभा या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढविण्यात येणार आहे. या सभेसाठी दोन लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहतील असे संयोजकांकडून सांगण्यात येत असून, या सर्वांचे अत्यंत चूक व्यवस्था करण्यात आली आहे. संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन, अत्याधुनिक भव्य मंडप उभारण्यात आला असून दोन व्यासपीठावर उभारण्यात आली आहेत. एका व्यासपीठावर खा. राहुल गांधी, मा. शरद पवार, अकेले भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व प्रमुख अतिथी असतील, तर दुसऱ्या व्यासपीठावर राज्यातील व जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे सोय करण्यात आली आहे.

या सभेमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोण काय भाष्य करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असून, देशातील वाढती महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचा विषय या सभेमध्ये गाजणार हे नक्की.