Sangli Samachar

The Janshakti News

राज्यभरातील 300 हून अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत, डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २२ सप्टेंबर २०२४
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न मराठी डिजिटल मीडिया परिषदेची पहिली राज्यस्तरीय कार्यशाळा, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद यांनी आयोजित केलेल्या या कार्यशाळेस, राज्यभरातून 300 हून अधिक युट्युब व पोर्टल चैनल चे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या कार्यशाळेचे उद्घाटन लखनऊ येथील न्यूज 4 पीएमपी संपादक श्री. संजय शर्मा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस एम देशमुख हे होते. यावेळी व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क विभागाच्या उपसंचालिका सौ. वर्षा पाटोळे, पुणे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री. मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त श्री. किरण नाईक, श्री. शरद पाबळे, पुणे विभागीय सचिव श्री. गणेश मोकाशी, जिल्हाध्यक्ष श्री सुनील लोणकर, डिजिटल मीडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे अनेक मान्यवर उपस्थित होते.


यावेळी आपल्या मनोगतात न्यूज 4 पीएम चे संपादक श्री संजय शर्मा यांनी आपला संघर्ष, आपले अनुभव कथन करून, डिजिटल मीडियातील संपादक व पत्रकारांनी कोणाचाही मुलाहिजा ठेवता प्रभावीपणे समाजाचे प्रश्न मांडण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी कथन केलेले अनुभव व प्रसंग डिजिटल मीडियातील नवोदिकांसह प्रस्थापितांना अत्यंत मार्गदर्शक ठरले.

सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी डिजिटल मीडियासमोर असलेल्या आव्हानांचा उल्लेख करीत, कायद्याचा आदर राखून डिजिटल मीडियातील संपादक पत्रकारांनी आक्रमकपणे कार्यरत राहण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाचाही उल्लेख केला.

मॅक्स महाराष्ट्र मीडियाचे संपादक रवींद्र आंबेकर यांचे मार्गदर्शन अतिशय प्रभावी ठरले. त्यांनी आपल्या मनोगतात पत्रकारितेतील बारकावे अतिशय सक्षमपणे मांडले. यावेळी उपस्थित डिजिटल मीडियातील संपादक व पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. त्यांच्या मनोगताने उपस्थितांची मने जिंकल्याचे पहावयास मिळाले.

प्रिन्सिपॉल व मास कम्युनिकेशन जर्नालिस्ट प्रा. किशोर वायकर यांनी डिजिटल मीडियातील बारकावे स्पष्ट करताना, संपादक व पत्रकारांना अतिशय मौलिक सूचना केल्या. त्याचप्रमाणे आगामी काळात राज्यभरातील डिजिटल मीडियातील संपादक-पत्रकारांना कार्यशाळेचे आयोजन केल्यास मोफत मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे यापुढील काळात राज्यभरातील डिजिटल मीडियामधील संपादक, पत्रकारांना त्यांच्या अनुभवाचा मोठा फायदा मिळणार आहे.

ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी श्री अनिल वडघुले अध्यक्ष पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, श्री अविनाश आदक कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, श्री महावीर जाधव अध्यक्ष डिजिटल मीडिया परिषद, श्री सुरज साळवे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, श्री सुनील पवार उपाध्यक्ष जिल्हा प्रतिनिधी, श्री संतोष गोतावळे उपाध्यक्ष डिजिटल मीडिया परिषद, श्री विनायक गायकवाड सचिव पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, श्री प्रकाश जमाले सहसचिव पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, श्री नितीन कालेकर सचिव, श्री जेम्स साळवे सहसचिव, श्री विनायक गायकवाड सचिव पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, श्री अशोक कोकणे सरचिटणीस पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, श्री. पराग डिंगणकर खजिनदार पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, श्री. सिद्धांत चौधरी खजिनदार, श्री. प्रकाश अनंत सह खजिनदार, श्री सागर सुरवसे सचिव पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, श्री विनय सोनवणे सह खजिनदार, तसेच पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सदस्य डॉ. 
श्री. देविदास शेलार, श्री. राजकुमार शेंडगे, श्री. राकेश पगारे, श्री. माऊली भोसले, श्री. ओम गवळी, श्री. राम गायकवाड, श्री. देविदास लिमजे, श्री. राम पाटील, श्री. रमेश साठे, श्री. सतीश जाधव, सौ. श्रद्धा प्रभुणे, सौ आम्रपाली गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांनी केलेल्या नेटक्या नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया उपस्थित डिजिटल मीडिया व पत्रकारांनी देऊन समाधान व्यक्त केले.