| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ ऑगस्ट २०२४
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षास आज भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री.शेखर इनामदार साहेब यांनी भेट देऊन महापालिकेने पूर परिस्थितीबाबत केलेले उपाययोजना व पूर परिस्थितीत केलेले नियोजन याबाबत माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त मा.रविकांत अडसूळ यांनी पूर बाधित क्षेत्रातील नागरिकांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी महापालिकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत असून पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी घाबरू नये प्रशासनांशी समन्वय साधून संभाव्य आपत्ती वर आपण नक्की मात करू असे आश्वस्त केले. याप्रसंगी नकुल जकाते, योगेश कापसे, रोहित जगदाळे,अंकुर तारळेकर आदी उपस्थित होते.