| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २ ऑगस्ट २०२४
गतसप्ताहात राहुल गांधी यांनी लोकसभेत भारतीय जनगणने वरील मागणी केल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात काढली. त्यानंतर संसदेबरोबरच संपूर्ण देशभरात काँग्रेस प्रेमी मध्ये ठाकूर यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी नुकतीच एक ट्विट केल्यामुळे या वातावरणात अजूनच भर पडली. संसदेत आपण केलेले भाषण दोघांमधील एकाला आवडले नाही, चक्रव्युहाचा संदर्भ आपल्यावरही पिढीच्या कारवाईस कारणीभूत ठरेल अशी भीती राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.
एका ईडीच्या अधिकाऱ्याने आपल्याला कारवाईबाबत माहिती दिली असून त्यासंदर्भात योजना तयार करण्यात येत असल्याचे राहुल गांधी यांनी X या सोशल मीडियावरील ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. आपण या कारवाईची प्रती त्यांच्यासाठी चहा बिस्किटे तयार ठेवण्याचा टोमणा राहुल गांधी यांनी मारला आहे.
काय आहे विषय
29 जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वर बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले होते की, देशातील शेतकरी, मजूर आणि तरुण घाबरले आहेत. महाभारत युद्धाच्या चक्रव्यूहचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला. महाभारतातील युद्धात सहा जणांनी अभिमन्यूला मारले. आता नवे चक्रव्यूह तयार केले जात आहे. तेही चक्रव्यूह कमळाच्या आकाराचे होते. त्या कमळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी छातीवर घेऊन फिरतात. अभिमन्यूला द्रोण, कर्ण, कृपाचार्य, कृतवर्मा, अश्वस्थामा आणि शकुनी अशी 6 जणांनी मारली. आजही चक्रव्यूहाच्या मध्येही 6 लोक आहेत. त्यावेळी सहा लोक होते. तसेच आजही आहे. त्यात मोदी, शाह, संघ प्रमुख मोहन भागवत, डोवाल, अदानी आणि अंबानी आहेत. हे सर्व काही कंट्रोल करत आहेत.