Sangli Samachar

The Janshakti News

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता - जयंत पाटील यांचा दावा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ ऑगस्ट २०२४
लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाने आणि भाजपानेच केलेल्या सर्वेतून त्यांना मिळणाऱ्या अपयशाची चाहूल लागल्याने महाराष्ट्रात आगामी विधानसभा पुढे ढकलण्याची हालचाल सुरू झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. 9 ऑगस्ट च्या क्रांती दिनापासून 'शिवसुराज्य यात्रा - 2' सुरू करणार असल्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की आम्ही बहुजनांचे सरकार पुन्हा एकदा आणणार आहोत त्याच्यासाठी जनतेच्या दरबारात आम्ही जात आहोत. लोकसभा निवडणुकीला जनतेने ना पसंती दिली आहे. त्याच वेळी महाविकास आघाडीला 31 जागा देऊन जनतेने आगामी विधानसभेची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे.


या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान आम्ही, राज्यातील कायदा सुव्यवस्था कशी ढासळली आहे, बेरोजगारी कशी वाढली आहे, हे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र राज्य कसं मागं गेलं आहे, हे जनतेच्या निदर्शनास आणून सरकारचे काळे कारणामे आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहोत असे सांगत जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी लढणार आहे त्या मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा जाणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

शिवस्वराज्य यात्रा 'या' मतदारसंघातून जाणार

१. जुन्नर
2. आंबेगाव
3. खेड आळंदी
4. भोसरी
5. शिरूर
6. हडपसर
7. खडकवासला
8. दौंड
9. इंदापूर
10. बारामती
11. माळशिरस
12. मोहोळ
13. सोलापूर उत्तर
14. माढा
15. करमाळा
16. परांडा
17. तुळजापूर
18. उदगीर
19. अहमदनपूर
20. केज
21. आष्टी
22. बीड
23. माजलगाव
24. परळी
25. गंगाखेड
26. पाथरी
27. जिंतूर
28. बसमत
29. घनसावंगी
30. बदनापूर
31. भोकरदन