Sangli Samachar

The Janshakti News

आयुक्तांच्या अख्तरीतील तक्रार निवारण कक्षाने नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑगस्ट २०२४
मा शुभम गुप्ता भा. प्र. से. यांची सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त पदी नियुक्ती दि ८/ ४/ २०२४ रोजी झाली आणि येथील भागाची पाहणी करून माहिती घेतली असता अनेक समास्या आणि त्या बाबत असलेल्या नागरिकांच्या प्रश्नी नोंद घेण्यासाठी प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे, ही बाब त्यांच्या लक्षात आल्यावर नागरिकांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करून आपल्या अखत्यारीत कार्यान्वित केला.

GRC (Grievance Redressal Cell ) या नावाने सर्व नागरिकांना त्याची ओळख झाली आहे. आतापर्यत प्राप्त २४१ तक्रारी नुसार ८० च्यावर तक्रारींचे त्याकाळ निवारण झाले आहे, अनेक तक्रारी या विविध विभागाशी संबंधित असल्याने समन्वयाने त्यांचे निवारण होण्याची प्रक्रिया सुरू देखील झाली आहे. नागरिकांचे समाधान होत असल्याने प्रत्येक आठवड्यात GRC प्रलंबीत प्रकरणाचा मा. आयुक्त व सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आढावा घेतला जातो आणि ज्या विभागाकडून प्रकरणे विलंब होत आहे, त्यांना सदरचे प्रकरण निकाली काढणे कामी आदेश देऊन कार्यवाही मुदतीत पूर्ण करण्यासाठी देखील सूचित केले जात आहे.


मा शुभम गुप्ता आयुक्त यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी तक्रारी देताना अनेक मुद्दे एकत्रित करून तक्रारी केल्याने आणि विविध विभागाकडील असलेल्या तक्रारी यामुळे तक्रार निवारण करण्यास वेळ लागत असला तरी, तक्रारी निवारण होत असल्याने हा कक्ष आता नागरिकामध्ये लोकप्रिय होत आहे. तक्रारींचे निवारण मुदतीत करण्यासाठी नागरिकांनी मुद्देनिहाय, विभागनिहाय तक्रार केली तर तक्रार लवकरात लवकर निवारण होऊन वेळ आणि कष्ट देखील वाया जाणार नाही.

तक्रार निवारण कक्ष हा नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी याच्या वर तत्काळ उपाय व्हावा म्हणून कार्यरत केला आहे. त्याच्या लाभ घेऊन समस्याची तीव्रता कमी करणे हा उद्देश असल्याने पूर्ण क्षमतेने काम करावा यासाठी आयुक्त यांनी आपल्या देखरेखीखाली कार्यरत ठेवला आहे, त्याचे नियंत्रण आयुक्त कार्यालयातून केले जात आहे. तक्रारी निवारण आणि समस्येच्या मुळाशी जाऊन निपटारा करणे या उद्देश GRC च्या आहे असे यावेळी सांगितले आहे.