Sangli Samachar

The Janshakti News

चाळीस फुटीर आमदारांचीच काळजी असल्याने महिला व मुलींना संरक्षण देण्यात सरकार अपयशी, डॉ. विश्वजीत कदम यांचा आरोप


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ ऑगस्ट २०२४
राज्यातील महिला व तरुण मुलींना संरक्षण देण्याऐवजी, शिवसेनेतून फुटून भाजपला सत्ता स्थापनेसाठी मदत केलेल्या चाळीस आमदारांचेच काळजी असल्याने, शासन राज्यातील महिला व मुलींना संरक्षण देण्यात कमी पडीत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा काँग्रेसचे युवा नेते डॉ. विश्वजीत कदम यांनी केला आहे.

बदलापूर आणि राज्यातील इतर शहरात एकापाठोपाठ एक तरुणी, महिला इतकेच नव्हे तर लहान बालिकांवरील अत्याचाराच्या घटनाबाबत संताप व्यक्त करून डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, बदलापूर येथील घटनेबाबत सरकारने तात्काळ उपायोजना करण्याची गरज होती, मात्र जिथे हा दुर्दैवी संतापजनक प्रकार घडला, शाळेचे प्रशासक आणि कोणतीही शहानिशा न करता कंत्राटी कामगार म्हणून नियुक्त केलेला निर्णय स्वच्छता कर्मचारी राज्यातील मोठ्या पक्षांशी संबंधित असल्याने या प्रकरणातील दोषींना वाचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे समोर आल्यानंतर राज्यातून एकच संताप व्यक्त करण्यात येत आहे, असेही डॉ. कदम यांनी म्हटले आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणी डॉ. विश्वजीत कदम यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार असल्यानेच या पुतळ्याची उभारणी घाईघाईत केली गेल्याने, पुतळ्याच्या सुरक्षेततेकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप करून डॉ. कदम म्हणाले की, अवघ्या सहा महिन्यात पुतळा कोसळतो यामध्ये निश्चित काहीतरी काळेबेरे आहे, या संताप जनक प्रकरणाचा तपास पोलिसाऐवजी केंद्रीय समितीकडून करण्यात यावा असे मागणे हे त्यांनी केली.

जळगाव येथील लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमावरून डॉ. विश्वजीत कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. येथील 24 पर्यटक नेपाळमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले असतानाच, याच जळगावात भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला जातो आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतात, यावरून त्यांच्या मनात जनतेविषयी किती कळवळा आहे हे लक्षात येते, असा डॉ. विश्वजीत कदम यांनी आरोप केला आहे.