Sangli Samachar

The Janshakti News

बदलापूर प्रकरणी सरकार नियुक्त द्विसदस्यीय समितीच्या अहवालात अनेक धक्कादायक संतापजनक बाबींचा उलघडा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ ऑगस्ट २०२४
बदलापूर येथील आदर्श शाळेमध्ये नुकत्याच घडलेल्या बालिकेवरील अत्याचार प्रकरणी राज्य सरकारने नियुक्ती केलेल्या द्विसदस्यीय समितीच्या चौकशी अहवालात अनेक धक्कादायक व संतापजनक बाबी समोर आल्या आहेत. 

अहवालात नेमके काय?

🔹️१ ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची कोणतीही सामाजिक पार्श्वभूमी न तपासता, त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारसी करण्यात आली, हे शोधण्याची गरज आहे.
🔹️त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्राशिवाय सहज प्रवेश होता. 
🔹️स्वच्छतागृह एका निर्जन ठिकाणी आणि कर्मचारी कक्षापासून दूर आहे. सुरक्षिततेसाठी योग्य सीसीटीव्ही बसवलेले नाहीत.
🔹️या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने पालकांना विचारले की, 'मुली दोन तास सायकल चालवतात का?'... यावरून असे दिसून येते की अशा संवेदनशील प्रकरणांना हाताळण्याची कोणतीही संवेदनशीलता आणि ज्ञान अधिकाऱ्याला नव्हते.
🔹️त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला जवळपास एक इंच इजा झाली असल्याचे म्हटले आहे.
🔹️गेल्या पंधरा दिवसांत अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता आहे.
🔹️शाळा प्रशासन तब्बल ४८ तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.
🔹️तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही.


चौकशी समितीच्या अहवालात याशिवाय आणखीही काही गंभीर बाबी समोर आल्याचे समजते. शासन आता काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे