| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑगस्ट २०२४
सांगली येथील अत्याचार पीडित तरुणीला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, तसेच यासाठी इस्लामपूर येथील सरकारी वकील शुभांगी पाटील यांची नियुक्ती करावी अशी मागणी मैत्रिण संघटनेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती भाजपाच्या नेत्या सौ. निताताई केळकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.
याबाबत अधिक माहिती देताना सौ केळकर म्हणायला की अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा गुंड संजय प्रकाश माने यांच्याबाबत कारागृह अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखविला आहे. पेरोची मुदत संपल्यानंतर हे तो दोन दिवस बाहेर होता, आणि याच कालावधीत त्याने हे काळे कृत्य केले आहे. पॅरोलची मुदत संपल्यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी संजय नगर पोलिसांना याबाबत माहिती कळवायला हवी होती, ती कळवली गेली नाही, त्यामुळे कारागृह अधिकाऱ्यांची ही चौकशी करण्याची मागणी आपण केल्याचे त्यांनी सांगितले.
कोलकत्ता, बदलापूर आणि राज्यातील इतर ठिकाणी झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आम्ही सांगली मिरज शासकीय रुग्णालयांना भेट देऊन तेथील डॉक्टरांच्या समस्या जाणून घेतल्या. शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, सखी सावित्री समिती तसेच विशाखा समिती नेमण्याबाबत पाठपुरावा केला आहे. त्याचप्रमाणे लवकरच आम्ही विद्यार्थी पालक मेळावा घेऊन जनजागृती ही करणार आहोत असेही सौ केळकर म्हणाल्या.